7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी तसेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आहे. ही बातमी सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांसाठी व पेन्शन धारकांसाठी खास ठरणार आहे.
खरे तर सातवा वेतन आयोग आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. सरकारने नव्या आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली असून लवकरच याची अंमलबजावणी सुद्धा होणार आहे.

दरम्यान आठवा वेतन आयोग लागू होण्याआधी सातवा वेतन आयोगांतर्गत पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. मार्च महिन्यात केंद्रातील सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला होता.
त्यावेळी झालेल्या निर्णयानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्क्यांवर पोहोचला. महत्वाची बाब म्हणजे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली.
केंद्राच्या निर्णयानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी व पेन्शन धारकांसाठी सुद्धा महायुती सरकारने महागाई भत्ता वाढीची मोठी घोषणा केली.
यानंतर आता पुन्हा एकदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. ही सातवा वेतन आयोगातील शेवटची महागाई भत्ता वाढ ठरणार आहे.
ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे डी.ए वाढवला जात असतो. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून DA 3% वाढणार अशा चर्चा होत्या. पण आता नवीन माहिती समोर आली आहे.
ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाची जानेवारी – जून या काळातील आकडेवारीवरून महागाई भत्ता किती वाढणार हे क्लिअर होणार आहे. या आकडेवारीनुसार यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 4 टक्के वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. अर्थात महागाई भत्ता 59% होणार आहे.
सदर डी.ए वाढ आधी केंद्र सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना लागु करण्यात येईल. त्यानंतर मग महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना याचा लाभ मिळेल. महत्त्वाची बाब म्हणजे याबाबतचा निर्णय पुढील महिन्यात होऊ शकतो असा अंदाज आहे.
याचा शासन निर्णय पुढील महिन्यात निघणार असला तरी देखील प्रत्यक्षात महागाई भत्ता वाढ जुलै महिन्यापासून लागू राहील. अर्थात कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून महागाई भत्ता फरकाचाही लाभ मिळणार आहे.