Ladki Bahin Yojana : गेल्यावर्षी महायुती सरकारने अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केली. या नव्या योजनेला लाडकी बहिण योजना असे नाव देण्यात आले असून या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय.
या योजनेचा लाभ राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दिला जात असून आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना 13 हप्ते मिळाले आहेत. योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता गेल्या महिन्यात जमा झाला होता.

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळाला. तसेच गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ऑगस्ट महिन्याचा हप्ता दिला जाईल अशा चर्चा होत्या. पण तसं काही झालं नाही.
सप्टेंबर महिना सुरू होऊन दहा दिवसांचा काळ उलटला तरीही लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला नाही.
पण दोन दिवसा आधीच सरकारने लाडक्या बहिणीच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी निधी वितरणास मंजुरी दिली होती. दरम्यान आज पासून प्रत्यक्षात लाडक्या बहिणींच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
स्वतः राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंदर्भातील माहिती दिली आहे.
आज पासून लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासूनची लाडक्या बहिणीची प्रतीक्षा आता संपणार आहे.
नवरात्र उत्सव सुरू होण्याआधीच लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला असल्याने आता सप्टेंबरचा हप्ता देखील वेळेत मिळेल अशी आशा आहे.
नवरात्र उत्सव 22 सप्टेंबर पासून सुरू होतोय यामुळे या नवरात्र उत्सवाच्या कालावधीतच लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे पैसे दिले जाऊ शकतात अशा काही चर्चा देखील आता सुरू झाल्या आहेत.