Banking News : अलीकडे ईएमआय वर वस्तू खरेदी करण्याचा ट्रेंड वाढला आहे. तुम्हीही जर ईएमआयने वस्तू खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अधिक कामाची राहणार आहे. विशेषता EMI वर मोबाईल खरेदी करणाऱ्यांसाठी ही बातमी विशेष खास ठरणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून बजाज, TVS अशा फायनान्स कंपन्यांकडून ग्राहकांना सहजतेने कर्ज मंजूर करून दिले जात आहे. या फायनान्स कंपन्या झिरो डाउन पेमेंट वर मोबाईल उपलब्ध करून देत आहेत.

विशेष म्हणजे यावर व्याज सुद्धा कारले जात नाही फक्त काही प्रोसेसिंग फी आकारली जाते. इन्शुरन्स व प्रोसेसिंग फी भरल्यानंतर आता ग्राहकांना झिरो डाउन पेमेंट वर कोणत्याही कंपनीचा मोबाईल मिळू शकतो.
बजाज फायनान्स याबाबत आघाडीवर आहे. यामुळे गेल्या काही वर्षांच्या काळात स्मार्टफोनची विक्री सुद्धा वाढलेली आहे. दरम्यान आता EMI वर मोबाईल घेणाऱ्या ग्राहकांसाठी आरबीआयकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
RBI जे ग्राहक ईएमआय भरू शकणार नाहीत त्यांचा स्मार्टफोन रिमोटली लॉक करण्याचा अधिकार फायनान्स कंपन्यांना देण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे. साहजिकच आरबीआयच्या या निर्णयामुळे बजाज टीव्हीएस चोलामंडल सारख्या फायनान्स कंपन्यांचे अधिकार आणखी वाढणार आहेत.
खरे तर गेल्यावर्षी रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून कर्ज बुडवणाऱ्या ग्राहकांचे फोन लॉक करणे थांबवण्यात आले होते. ग्राहकांचा डेटा सुरक्षित राहावा यासाठी आरबीआय ने गेल्या वर्षी हा निर्णय घेतला होता.
पण आता आरबीआय स्वतः अशी एक यंत्रणा तयार करणार आहे. स्मार्टफोनसाठी कर्ज देताना डिव्हाइस लॉक करण्यासाठी एक अॅप स्थापित केले जाईल.
कर्जदारांशी चर्चा केल्यानंतर आरबीआय पुढील काही महिन्यांत फेअर प्रॅक्टिस कोड अपडेट करण्यासह फोन-लॉकिंग यंत्रणेबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार अशी सुद्धा माहिती यावेळी समोर आली आहे.
या नव्या निर्णयातून कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था फोन लॉक करून कर्जाची रक्कम वसूल करू शकतील. तसेच आरबीआयची स्वतःची सिस्टीम तयार होणार असल्याने ग्राहकांचा डाटा सुद्धा पूर्णपणे सुरक्षित राहणार आहे.
पण यासंदर्भात अजून अधिकृत माहिती हाती आलेली नाही. यामुळे आता याबाबत नेमका काय निर्णय होतो हे पाहणे उत्सुकतेचे राहील.