EPFO News:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून आपल्या सदस्यांसाठी अनेक महत्त्वाचे असे निर्णय घेतले जात असून या निर्णयामुळे पीएफची रक्कम काढणे तसेच पीएफ हस्तांतरण व इतर अनेक कामे सोपी होणार आहेत.
यामध्ये जर पीएफचे पैसे काढायचे असतील तर यासाठीची सध्याची प्रक्रिया खूपच वेळखाऊ आणि किचकट असल्याने बरेचदा क्लेम केल्यानंतर खात्यात रक्कम जमा व्हायला बराच वेळ लागतो किंवा बऱ्याचदा क्लेम सेटल होत नाही व त्यामुळे खूप मोठा त्रासाला सामोरे जावे लागते. परंतु आता ईपीएफओने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार पीएफ धारकांना त्यांचे पीएफचे पैसे एटीएम मधून काढता येणार आहेत व तशी परवानगी केंद्र सरकार दिवाळीपूर्वी देऊ शकते अशी माहिती समोर आलेली आहे.

दिवाळीपूर्वी एटीएम मधून काढता येणार पीएफचे पैसे
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्र सरकारच्या माध्यमातून दिवाळीपूर्वी पीएफ खातेधारकांना एटीएम मधून पीएफचे पैसे काढण्याची परवानगी देण्याची शक्यता आहे. यासंबंधी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली 10-11 ऑक्टोबर रोजी एक बैठक होणार आहे व ज्यामध्ये या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे .
यामागील सरकारचा उद्देश असा आहे की दिवाळीच्या अगोदर देशातील सुमारे आठ कोटी ईपीएफओ सदस्यांना खर्च करता यावा यासाठीची ही अधिकची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे यामध्ये ईपीएफओ बोर्ड किमान पेन्शन महिन्याला 1000 रुपयावरून एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे रुपये करण्याच्या प्रस्तावावर देखील विचार करू शकते.
ईपीएफओ नवीन डिजिटल सेवा ईपीएफओ 3.0 सुरू करणार असून यामुळे पैसे काढणे सोपे होणार नाही तर खातेधारकांना कुठली माहिती अपडेट करायची असेल तर ती देखील करता येणार आहे व दावा करण्याची प्रक्रिया देखील खूप जलद होणार आहे. या डिजिटल सेवेच्या माध्यमातून कर्मचारी युएएन सक्रिय करून आणि आधार खात्याशी लिंक करून एटीएम मधून पैसे काढू शकणार आहेत.
एटीएम आणि यूपीआय मधून पीएफचे पैसे कसे काढायचे?
या सुविधेमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ग्राहकांसाठी एक विशेष एटीएम कार्ड जारी करणार आहे व हे कार्ड संबंधित खातेधारकाच्या पीएफ खात्याशी जोडले जाणार आहे. या कार्डचा वापर करून ग्राहक त्यांचे पीएफचे पैसे एटीएम मशीन मधून काढू शकणार आहेत. यूपीएच्या माध्यमातून पैसे काढायचे असेल तर तुम्हाला पीएफ खाते यूपीआयशी लिंक करणे गरजेचे राहील व यानंतर ग्राहक त्यांच्या बँक खात्यात पीएफचे पैसे ट्रान्सफर करू शकतील.