Job News:- तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल व विविध परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्या करता आनंदाची बातमी आहे. ती बातमी म्हणजे राज्याच्या भूमी अभिलेख विभागामध्ये सर्वेअर म्हणजेच भुकरमापक आणि लघुलेखक यासह इतर पदांसाठी भरती होणार असून साधारणपणे या भरतीच्या माध्यमातून 905 रिक्त पदे भरली जाणार आहेत. महत्वाचे म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून या भरती प्रक्रियेला सध्या तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे. चला तर मग या भरती प्रक्रियेची थोडक्यात माहिती या लेखात बघू.
भूमी अभिलेख विभागामध्ये 905 पदांसाठी भरती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्याच्या भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून भुकर मापक आणि लघुलेखक आणि इतर 905 रिक्त पदांसाठी भरती होणार असून या भरतीसाठी राज्य शासनाने तत्वतः मान्यता दिली आहे. या भरतीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर, पुणे,मुंबई,नासिक, अमरावती आणि नागपूर या महसुली विभागामधील रिक्त असणाऱ्या पदानुसार या रिक्तपद संख्येमध्ये वाढ होऊ शकते. आपल्याला माहित आहे की भूमी अभिलेख विभाग हा अत्यंत महत्त्वाचा विभाग असून जमीन मोजणीच्या कामासंदर्भात या विभागाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

जमीन मोजणीची प्रलंबित प्रकरणे पाहता गेल्या दोन वर्षांपूर्वी 1200 भुकर मापकांची पद भरती करण्यात आलेली होती. मात्र यामधून काही कारणामुळे 700 जणांनी नोकरीचा राजीनामा दिला होता व राजीनामा दिल्यामुळे भुकरमापकांची पदे रिक्त झाली. अशामुळे जमीन मोजण्याचे प्रकरणे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित राहण्याची संख्या वाढल्याचे दिसून आले. ही बाब लक्षात घेऊन आता भुकरमापकांच्या भरतीसाठी भुमिलेख विभागाने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला होता व त्याला आता तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे.
या पदासोबतच लघुलेखक निम्न श्रेणी आणि लघुलेखक उच्च श्रेणी या पदांसाठी देखील भरती करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुंबई महसूल विभागात 259 पदे रिक्त आहेत. नाशिक विभाग 124, छत्रपती संभाजी नगर 210, अमरावती 117, नागपूर 112 अशी एकूण 905 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.