दीड रुपयांचा शेअर्स बनवतोय गुंतवणूकदारांना लखपती! एका लाखाचे झालेत 12 लाख

Published on -

Penny Stock : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना काही शेअर्स मधून चांगली कमाई होते तर काही स्टॉक्स गुंतवणूकदारांचे नुकसान सुद्धा करत असतात. बाजारातील तज्ञ नेहमीच गुंतवणूकदारांना लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला घेतात.

पण काही असेही स्टॉक आहे तुझ्या की शॉर्ट टर्म मध्ये गुंतवणूकदारांना चांगला पैसा मिळवून देतात. पण सहसा शाश्वत परताव्यासाठी लॉन्ग टर्म गुंतवणूक फायद्याची ठरते.

दरम्यान आज आपण अशा एका शेअर्सची माहिती पाहणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांच्या एका लाखाचे बारा लाख रुपये बनवले आहेत.

एक्सेल रियल्टीच्या स्टॉकने ही किमया साधली आहे. काल गुरुवारी सुद्धा या स्टॉक मध्ये 1.88 टक्क्यांची वाढ झाली. कालची या शेअरची क्लोजिंग प्राइस 1.62 रुपये होती.

गत 30 दिवसांपासून हा शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देत आहे. याआधी पण या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे.

एका लाखाचे झालेत बारा लाख 

खरे तर एक्सेल रियल्टी काही निवडक वित्तीय संस्थांना 500 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहे. कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरने या योजनेला मंजुरी दिली आहे.

दरम्यान ही बातमी ब्रेक झाल्यापासूनच या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आहेत. कंपनी 500 कोटी रुपयांची उभारणी करण्याची योजना आखत असल्याने हा स्टॉक तेजीत आला आहे.

एका महिन्यापूर्वी या शेअरची किंमत 1.08 होती. आता हा स्टॉक 1.63 रुपयांवर पोहोचला आहे.  अर्थात एका महिन्याच्या काळात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत.

एका महिन्यापूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने या कंपनीचे एक लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले असते तर त्याची किंमत आज 1.50 लाख रुपये झाली असती. या स्टॉकच्या पाच वर्षांच्या कामगिरी बाबत बोलायचं झालं तर पाच वर्षांपूर्वी या शेअरची किंमत 13 पैसे होती.

अशा तऱ्हेने जर पाच वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने यात एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य बारा लाख रुपये झाले असते. अर्थात साठ महिन्यात गुंतवणूकदारांना 11 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला असता.

पाच वर्षात या स्टॉकने गुंतवणूकदारांना 1100% रिटर्न दिले आहेत. ही कंपनी 2003 मध्ये सुरू झाली आहे. 2015 पूर्वी या कंपनीचे नाव एक्सेल इन्फोवेज प्रायव्हेट लिमिटेड असे होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News