Investment Tips: तुमच्या मुलाच्या 5 व्या वर्षापासून 5 लाखांची गुंतवणूक करा अन मिळवा 2.64 कोटी! चक्रवाढीची जादू करेल कमाल

Published on -

Investment Tips:- तुमच्या मुलांच्या समृद्ध आर्थिक भविष्यासाठी त्यांच्या जन्माच्या काही वर्षानंतर गुंतवणूक करणे अतिशय गरजेचे आहे. कारण भविष्यामध्ये मुलांचे शिक्षण तसेच लग्नकार्य व इतर आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता भासते व अशा परिस्थितीत जर मुलांचा आर्थिक पाया मजबूत करायचा असेल तर मात्र सुरुवातीपासून गुंतवणूक करण्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. गुंतवणूक पर्याय निवडताना जर तुम्ही स्मार्ट पर्यायांचा वापर केला तर नक्कीच तुम्हाला लाखाची रक्कम कोटी रुपयांमध्ये परावर्तित करता येऊ शकते.

तुम्ही तुमच्या मुलाच्या वयाच्या पाचव्या वर्षापासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकतात. म्युच्युअल फंड सारख्या पर्यायामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर यामध्ये तुम्हाला चक्रवाढीची खूप मोठी ताकद मिळते व त्यामुळे छोटीशी गुंतवणूक काही वर्षांनी अनेक कोटी रुपयांमध्ये परावर्तित होऊ शकते. याकरिता तुम्ही पाच लाख रुपयांची गुंतवणूक देखील तुम्हाला कोट्यावधी रुपये मिळवून देऊ शकते.

चक्रवाढीची ताकद वाढवते पैसा

गुंतवणूक पर्यायामध्ये तुम्हाला जर चक्रवाढ म्हणजेच कंपाऊंडिंगचा फायदा मिळत असेल तर तुम्ही जितके जास्त कालावधीसाठी पैसे गुंतवतात तितका तो पैसा वेगाने वाढत असतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर समजा तुम्ही पाच लाख रुपये वार्षिक 12 टक्के परताव्याने गुंतवले तर 35 वर्षांमध्ये तुम्हाला सुमारे 2.6 कोटी पर्यंत रक्कम मिळू शकते. म्हणजेच 50 पट जास्त परतावा तुम्हाला या माध्यमातून मिळतो. त्यामध्ये तुम्हाला फक्त दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करणे गरजेचे असते.

तुम्ही जर पाच लाखाची गुंतवणूक केली आणि अंदाजे यावर 12% व्याजदर मिळाला तर एक वर्षात तुम्हाला पाच लाखाचे 5.6 लाख रुपये मिळतात. अशा पद्धतीने जर तुम्ही 35 वर्षापर्यंत ही रक्कम गुंतवली तर तुम्हाला एकूण 2.64 कोटी रुपये या माध्यमातून मिळतात.वार्षिक 12 टक्के परताव्या ऐवजी जर तुम्हाला समान वार्षिक 13% चा परतावा मिळाला जो तुम्हाला इक्विटी म्युच्युअल फंड किंवा इतर बाजार संबंधित पर्यायांमधून मिळू शकतो. 13 टक्के परताव्याने तुमच्या पाच लाखांच्या गुंतवणुकीचे मूल्य 35 वर्षात अंदाजे 3.6 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते.

या सगळ्या आकडेवारीवरून आपल्याला दिसून येते की तुम्ही तुमच्या मुलाच्या वयाच्या जितक्या लवकर गुंतवणूक करायला सुरुवात कराल तितक्या कमी गुंतवणुकीत तुम्ही जास्तीचा परतावा मिळवू शकतात. एवढ्या मोठ्या रकमेतून तुम्ही तुमच्या मुलाचे भविष्य शैक्षणिक तसेच आर्थिकदृष्ट्या मजबूत करू शकतात. साधारणपणे तुमच्या मुलाचे सगळे आयुष्य या रकमेतून आर्थिक दृष्ट्या समृद्ध होऊ शकते. तुम्ही जर दीर्घकालीन बाजार जोखमी साठी तयार असाल तर म्युच्युअल फंड किंवा काही युलीप पर्याय तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकतात. काही वर्षांसाठी तुम्ही जर गुंतवणूक केली तर चक्रवाढीचा फायदा तुम्हाला मोठ्या प्रमाणावर मिळू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News