EPFO Pension Rule:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ ही एक महत्त्वाची संस्था असून ही संस्था देशातील खाजगी आणि सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ आणि निवृत्तीवेतनधारकांची पेन्शन याचे नियमन करत असते. त्यामुळे या संस्थेने केलेले नियम हे कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. अगदी याच पद्धतीने केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून नोकरदारांना एक अनोखी भेट देण्यात आलेली आहे व ही भेट नक्कीच काही कर्मचाऱ्यांसाठी खूप फायद्याची ठरणार आहे. चला तर मग यासंबंधीचीच माहिती या लेखात आपण बघणार आहोत.
1 महिना काम केल्यावर आता मिळेल ईपीएफओ पेन्शनचा लाभ
मिळालेल्या माहितीनुसार बघितले तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून देशातील नोकरदरांना एक मोठी भेट देण्यात आलेली आहे व ती भेट म्हणजे जर आता एखादा कर्मचारी फक्त एक महिना काम करत असेल तरी देखील त्याला ईपीएफओ पेन्शन, निवृत्ती वेतनाचा फायदा मिळणार आहे. या अगोदर अशा प्रकारचे पेन्शन फक्त जे कर्मचारी दीर्घ कालावधीपर्यंत काम करत असतील त्यांनाच मिळत होती.

परंतु आता या सगळ्या नियमांमध्ये मात्र बदल करण्यात आलेला आहे. या संस्थेने आता पेन्शन नियमात बदल केला असून एक महिना काम केल्यानंतर देखील कर्मचाऱ्यांना ईपीएफओ पेन्शनचा अधिकार मिळणार आहे. हा फायदा अल्पकालीन नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. आपल्याला माहित आहे की बरेच कर्मचारी अल्पावधीमध्ये नोकरी बदलतात किंवा काही दिवसांच्या करारासाठी काही कर्मचाऱ्यांना कामावर घेतलेले असते अशा कर्मचाऱ्यांना या नियमाचा खूप मोठा फायदा होणार आहे.
खास करून देशातील लॉजिस्टिक्स, बीपीओ तसेच कंत्राटी व अल्पकालीन क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना या नियमाचा खूप मोठा फायदा होणार आहे. ही क्षेत्रे अशी आहेत की या ठिकाणी कुठलाही कर्मचारी जास्त दिवस काम करत नाही.चांगली पगार मिळाली तर ठराविक कालावधीमध्ये ते नोकरी बदलतात. त्यामुळे या नवीन नियमाने आता अशा कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण होण्यास मदत होणार आहे.
अगोदरचा नियम काय?
या अगोदरचा नियम बघितला तर सहा महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी एखाद्या कर्मचाऱ्यांने काम केले असेल तर त्याला पेन्शनचा लाभ दिला जात न होता. परंतु आता नियमात बदल करण्यात आला असून एक महिना काम केल्यानंतर देखील कर्मचाऱ्याचे कर्मचारी निवृत्ती वेतन योजना अर्थात ईपीएस योजनेमध्ये समावेश करण्यात येणार आहे व त्या कर्मचाऱ्याला पेन्शनचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे कमीत कमी कालावधीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या नवीन नियमाचा अतिशय फायदा होणार आहे.