Bank Of Baroda FD : फिक्स डिपॉझिट योजनेत पैसा गुंतवायचा असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. या वर्षात देशभरातील विविध बँकांनी FD व्याजदरात कपात केली आहे. आरबीआयने रेपो रेट कपातीचा निर्णय घेतल्यानंतर बँकांकडून फिक्स डिपॉझिटवरील व्याजदर कमी करण्यात आले आहे.
त्यामुळे अनेकजण पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत आहेत. पण बँक ऑफ बडोदा आजही आपल्या ग्राहकांना चांगले व्याज देत आहे.

यामुळे जर तुमचाही बँक ऑफ बडोदाच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्याचा प्लॅन असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कारण आज आपण बँक ऑफ बडोदाच्या 444 दिवसांच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत.
कशी आहे 444 दिवसांची एफडी योजना ?
बँक ऑफ बडोदा ही पब्लिक सेक्टर मधील एक प्रमुख बँक आहे. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीची एफडी ऑफर केली जात आहे.
ही बँक फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.20 टक्क्यांपर्यंतचे व्याज देत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या बँकेकडून 444 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज दिले जाते.
बँक ऑफ बडोदा 444 दिवसांच्या FD वर सामान्य ग्राहकांना 6.60% व्याज देते. सिनिअर सिटीजन ग्राहकांना याच कालावधीच्या एफडी मध्ये गुंतवणूक केल्यास 7.10% व्याज मिळते.
त्याच वेळी सुपर सीनियर सिटीजन ग्राहकांना 7.20% व्याज दिले जाते. अर्थात सामान्य ग्राहकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना बँक ऑफ बडोदा अधिकचे व्याज देत आहे.
यामुळे जर तुमच्याही कुटुंबात कोणी सिनिअर सिटीजन असेल आणि त्यांना एफडी करायची असेल तर तुम्ही बँक ऑफ बडोदाचा विचार करू शकता.
दोन लाखांच्या गुंतवणुकीवर किती रिटर्न मिळणार?
बँक ऑफ बडोदा च्या एफ डी योजनेत दोन लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगले व्याज मिळणार आहे. सामान्य ग्राहकांना दोन लाखाच्या गुंतवणुकीवर दोन लाख 16 हजार 577 रुपये मिळतील.
अर्थात 444 दिवसात 16577 रुपये व्याज मिळणार आहे. सिनिअर सिटीजन ग्राहकांनी दोन लाखांची गुंतवणूक केल्यास त्यांना 2,17,876 रुपये मिळतील. सुपर सिनिअर सिटीजन ग्राहकांना दोन लाखाच्या गुंतवणुकीवर दोन लाख 18 हजार 134 रुपये मिळतील.