‘या’ बँकेच्या शेअर्समध्ये 19.5% ची घसरण होणार ! ब्रोकरेज म्हणतात शेअर्स विकून टाका, नाहीतर….

Published on -

Yes Bank Stock : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजची बातमी फारच कामाची ठरणार आहे. मार्केटमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार देखील चिंतेत आले आहेत. अशातच आता येस बँकेतील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 10 सप्टेंबर रोजी येस बँकेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने येस बँकेच्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशनच्या दुरुस्तीस मान्यता दिली आहे. यामुळे येस बँकेचे जपानी गुंतवणूकदार सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन (एसएमबीसी) ला येस बँकेच्या बोर्डात आपला प्रतिनिधी पाठविण्याचा अधिकार मिळाला आहे.

9 मे रोजी एसएमबीसीने येस बँकेत भागीदारी खरेदी करण्यासाठी शेअर खरेदी करारावर स्वाक्षरी केली होती. एसएमबीसीने येस बँकेत भागीदारी घेतली घरी पण तरीही काही ब्रोकरेज येस बँकेच्या शेअर्स साठी उत्साही नसल्याचे चित्र दिसते. एमके ग्लोबलने आजही येस बँकेच्या शेअर्स साठी Sell रेटिंग कायम ठेवलेली आहे. या ब्रोकरेज कडून येस बँकेच्या शेअर साठी 17 रुपयांची टार्गेट प्राईस सेट करण्यात आली आहे. म्हणजे येस बँकेच्या शेअर्सची किंमत 10 सप्टेंबर च्या क्लोजिंग प्राईजपेक्षा 19.5 टक्क्यांनी घसणार असा अंदाज ब्रोकरेज कडून देण्यात आला आहे.

एमके ग्लोबलने येस बँकेच्या शेअरसाठी सेल रेटिंग देताना दोन कारणे सांगितली आहेत. बँकेचे उच्च मूल्यांकन आणि कमकुवत नफा हे मुख्य कारण आहे. येस बँकेचा स्टॉक FY27 च्या अंदाजित कमाईच्या 1.2 पट ऍडजस्टेड बुक व्हॅल्यूवर व्यापार करीत आहे, जो बँकेच्या सध्याच्या नफ्यापेक्षा खूपच जास्त आहे. बँकेची कोर प्रॉफिटिबिलिटी अजूनही कमकुवत असल्याचे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. बँकेचा प्री-प्रोव्हिजन ऑपरेटिंग नफा (पीपीओपी) त्याच्या मालमत्तेच्या केवळ 0.9% आहे.

ही कमतरता प्रामुख्याने मंद वाढ, कमी मार्जिन आणि उच्च ऑपरेटिंग खर्चामुळे असल्याचे निरीक्षण ब्रोकरेज कडून नोंदवण्यात आले आहे. विशेषतः, उद्योगाच्या मोठ्या आयआरडीएफ पूलचा दबाव ( 37 हजार करोड म्हणजे एकूण कर्जाच्या 15%) बँकेच्या मार्जिनला भारी पडत आहे. याच कारणांमुळे सदर ब्रोकरेज कडून येस बँकेच्या शेअर्स विकण्याचा सल्ला दिला जातोय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe