Bank Of Baroda : फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी कामाची राहणार आहे. अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. तरुण वर्ग अधिक रिटर्न मिळत असल्याने शेअर मार्केट व त्यावर आधारित म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवत आहेत. तर दुसरीकडे असेही अनेक लोक आहेत जे की सुरक्षित गुंतवणुकीला महत्त्व दाखवत आहेत. महिला तसेच ज्येष्ठ नागरिक सुरक्षित गुंतवणूक म्हणून एफडी करण्याला प्राधान्य दाखवतात. म्हणून जर तुमच्याही कुटुंबातील कोणी महिला सदस्य किंवा जेष्ठ नागरिक एफडी करण्याच्या तयारीत असेल तर त्यांच्यासाठी बँक ऑफ बडोदाचा पर्याय बेस्ट राहणार आहे.
बँक ऑफ बडोदा देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फिक्स डिपॉझिटवर चांगले व्याज देत आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये ग्राहकांना सात दिवसांपासून ते दहा वर्षांच्या एफडी साठी खाती उघडता येतात. बँकेकडून एफडी वर 3.50% – 7.20% व्याज दिले जात आहे. बँकेकडून तीन वर्षांच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 6.5% व्याज दिले जात आहे. तीन वर्षांच्या एफडी साठी जेष्ठ नागरिक ग्राहकांना सात टक्के दराने व्याज दिले जात आहे. त्याचवेळी सुपर सीनियर सिटीजन ग्राहकांना बँकेकडून तीन वर्षांच्या एफडी साठी 7.10% दराने व्याज दिले जात आहे.

एक लाखाच्या गुंतवणुकीवर किती रिटर्न मिळणार?
सामान्य नागरिकांच्या तुलनेत बँक ऑफ बडोदा सिनिअर सिटीजन ग्राहकांना अधिक व्याज देते. अशा स्थितीत तीन वर्षांच्या एफडीत सुपर सीनियर सिटीजन ग्राहकांनी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना 7.10% दराने एक लाख 23 हजार 508 रुपये मिळतील. अर्थात 23 हजार 508 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत. सिनिअर सिटीजन ग्राहकांनी एक लाखांची गुंतवणूक केली तर तीन वर्षांच्या एफडी मधून सात टक्के व्याजदराने 23,144 रुपयांचे व्याज मिळणार आहे. सामान्य ग्राहकांनी एक लाखांची गुंतवणूक केली तर त्यांना 6.5% व्याजदराने 1,21,341 रुपये मिळणार आहे. म्हणजेच सामान्य ग्राहकांना व्याज म्हणून 21,341 रुपये मिळणार आहेत.