Small Business Idea : पैसे कमावण्यासाठी आपण अहोरात्र काबाडकष्ट करतो. पैशांसाठी आपल्यापैकी अनेकजण नोकरी करत असतील तर काहीजण व्यवसायात गुंतलेले आहेत. पण अलीकडे देशात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. कोणत्याच क्षेत्रात नोकऱ्या उरलेल्या नाहीत. जेवढ्या नोकऱ्या आहेत त्यापेक्षा अधिक तरुण बेरोजगार आहेत. प्रत्येकच क्षेत्रात उच्चशिक्षित तरुणांची संख्या वाढली आहे. यामुळे साहजिकच प्रत्येकाला नोकरी लागणार नाही. अशा स्थितीत काही तरुण व्यवसायाकडे वळत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासन सुद्धा कटिबद्ध आहे. तरुणांनी अधिकाधिक व्यवसायात यावे आणि इतरांनाही रोजगार उपलब्ध करून द्यावा यासाठी शासनाकडून त्यांना मदत दिली जात आहे.
नवनवीन स्टार्टअप सुरू करण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत पुरवली जात असून यासाठी वेगवेगळ्या योजना सुरू आहेत. दरम्यान जर तुम्हालाही तुमचा स्वतःचा बिजनेस सुरू करायचा असेल, स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा असेल तर आजचा हा लेख तुमच्या कामाचा राहणार आहे. कारण आज आपण एका जबरदस्त फ्रॅंचाईजी बिजनेस मॉडेल बाबत माहिती पाहणार आहोत. जर तुम्हाला फ्रेंचाईजी बिजनेस मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही येवले अमृततुल्यची फ्रेंचाईजी घेऊ शकता आणि अगदी पहिल्या दिवसापासूनच कमाई सुरू करू शकता. येवले अमृततुल्य हे असे नाव आहे जे की संपूर्ण महाराष्ट्रात किंबहुना महाराष्ट्राबाहेर देखील प्रसिद्ध आहे. भारतात चहा सर्वाधिक पिला जातो.

दवाखाना, कोर्ट, मार्केट, बैल बाजार, एसटी स्टँड रिक्षा स्टॅन्ड अशा सर्व ठिकाणी तुम्हाला चहाच्या टपऱ्या नजरेस पडतील. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये येवले अमृततुल्यची क्रेझ वाढली आहे. येवले अमृततुल्यच्या चहाची कॉलिटी पाहता ग्राहक आवर्जून यांच्या दुकानाला भेट देतात. अशा स्थितीत जर तुमच्या भागात अजून येवले अमृततुल्य आलेले नसेल तर तुम्ही त्यांची फ्रेंचाईजी घेऊ शकता आणि तुमच्या व्यवसायाला सुरुवात करू शकता. आता आपण येवले टी ची फ्रेंचायजी घ्यायची असल्यास किती खर्च करावा लागणार ? यांचे फ्रेंचाईजी मॉडेल किती प्रकारचे आहे याची माहिती जाणून घेऊयात.
किती खर्च करावा लागणार?
बिजनेस करायचा म्हणजे पैसा लागणारच. फ्रेंचाइजी बिजनेस असला तरीही मोठा पैसा खर्च करावा लागतो. येवले अमृततुल्य फ्रेंचाईजी साठी देखील तुम्हाला लाखो रुपयांचे बजेट तयार ठेवावे लागणार आहे. येवले टी ची फ्रॅंचाईजी फी तीन लाख + 18% जीएसटी आहे. यासाठी विपणन शुल्क एक लाख 50 हजार +18% जीएसटी लागणार आहे. तसेच इतर पायाभूत सुविधा खर्च म्हणून तुम्हाला पाच ते सहा लाख रुपये खर्च करावा लागेल. येवले टी दोन प्रकारची फ्रँचायझी ऑफर करते. पहिले मॉडेल म्हणजे Franchise OWNED franchise Operated अर्थात FOFO मॉडेल. तसेच दुसरे मॉडेल आहे FOCO मॉडेल. आता तुम्ही तुमच्या बजेटनुसार यापैकी कोणतेही मॉडेल सिलेक्ट करून तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. येवले अमृततुल्य सुरू करण्यासाठी तुमच्याकडे दीडशे ते तीनशे स्क्वेअर फुट जागा असणे आवश्यक आहे. मोकळी जागा असल्यास तुम्हाला त्या ठिकाणी शेड तयार करावे लागणार आहे. दुकान असल्यास अतिउत्तम कारण की अशा ठिकाणी शेडची गरज राहणार नाही. येवले टी फ्रॅंचाईजी घेऊन दुकान सुरू करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी दोन कामगार लागतील.
अर्ज कुठे करावा लागणार?
yewaleamruttulya.com ही येवले टी ची अधिकृत वेबसाईट आहे. तुम्हाला त्यांच्या फ्रेंचाईजी बिजनेस बाबत सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही या वेबसाईटला भेट देऊ शकता. तसेच फ्रॅंचाईजी साठी इच्छुक असलेल्या नागरिकांना याच वेबसाईटवरून ऑनलाइन अर्ज करता येतो. ऑनलाइन अर्ज करताना तुम्हाला सर्व प्रकारची कागदपत्रे जवळ ठेवावी लागणार आहेत. तुम्ही एकदा वेबसाईटवर अर्ज केला की मग तुमचे लोकेशन चेक करून येवलेची टीम तुमच्याशी संपर्क साधणार आहे.