ATM Rules : अलीकडे यूपीआयने पेमेंट करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. छोट्या व्यवहारांपासून मोठ्या व्यवहारांपर्यंत सगळीकडे यूपीआयचा वापर केला जातोय. भाजीपाला खरेदी करताना सुद्धा युपीआयचा वापर केला जातोय. यामुळे कॅशलेस इकॉनोमीला चालना मिळाली आहे. पण आजही अनेकजण कॅशनेच व्यवहार करण्याला पसंती दाखवतात. तसेच काही ठिकाणी यूपीआय काम करत नाही त्यावेळी आपल्याला कॅशचा वापर करावा लागतो.
तसेच काही मोठ्या व्यवहारांमध्ये कॅशचा वापर होतो. यामुळे कॅश काढण्यासाठी आजही एटीएम बाहेर ग्राहकांच्या रांगा लागतात. दरम्यान जर तुम्हीही सातत्याने एटीएमचा वापर करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी विशेष खास ठरणार आहे. खरे तर सोशल मीडियामध्ये एटीएम बाबत वेगवेगळे दावे केले जातात. असे सांगितले जाते की एटीएम मधून पैसे काढण्यापूर्वी दोनदा कॅन्सल बटन दाबले तर एटीएम मधून पिन चोरीला जात नाही. पण या चर्चा सुरू आहेत किंवा हा जो दावा केला जातो तो कितपत खरा आहे. याचबाबत आज आपण या लेखातून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

तज्ञ काय सांगतात?
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (PIB) फॅक्ट चेकमध्ये असे आढळून आले आहे की कॅन्सल बटन दोनदा दाबण्याचा पिन सुरक्षिततेशी कोणताही संबंध नाही. म्हणजे एटीएम मधून पैसे काढण्यापूर्वी दोनदा कॅन्सल बटन दाबले म्हणून तुमचा पिन सुरक्षित होतो या ज्या चर्चा आहेत त्या साफ खोट्या आणि निरर्थक आहेत. आरबीआय ने कोणालाही असे करण्यास सांगितलेले नाही. अनेक जण या ट्रिकचा वापर करतात. ही ट्रिक वापरली तर आपला पिन सुरक्षित राहतो असा सर्वसामान्यांचा समज आहे. पण ही एक प्रकारची फेक ट्रिक आहे याचा काहीही उपयोग होत नाही. यामुळे या फेक ट्रिककडे लोकांनी दुर्लक्ष करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दोन-तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियात अशाच प्रकारचा मेसेज सातत्याने व्हायरल होत होता. आता पुन्हा एकदा हाच मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र पीआयबीने आधीच कॅन्सल बटनाच्या या ट्रिकचा कोणताच उपयोग होत नसल्याचे स्पष्ट केले आहे. एटीएममधील कॅन्सल बटणाचं एकच काम आहे ते म्हणजे सुरू झालेला व्यवहार थांबवणे. तुम्ही व्यवहार सुरू केला अन तो मध्येच थांबवायचा असेल तर तुम्ही अशावेळी कॅन्सल बटन दाबा. असे केल्याने तुमचा व्यवहार तिथेच रद्द होईल.