पावसाळा संपल्याबरोबर 10 रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू करा ‘हा’ व्यवसाय ! पहिल्या दिवसापासून कमाई सुरु

Published on -

Small Business Idea : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो होतो. अलीकडे भारतात बेरोजगारीचा दर प्रचंड वाढला आहे. नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे युवकांनी छोटा मोठा व्यवसाय सुरु केलाय. तुम्हालाही व्यवसाय सुरू करायचा असेल, कमी भांडवलात व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास राहील. खरेतर, पावसाळा संपत आला की, महिलांमध्ये कॉटन मॅक्सीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. हलकी, आरामदायक आणि दररोज वापरण्यासाठी सोपी असल्याने यासाठी विशेष आवड निर्माण होते. त्यामुळेच, अनेक जण स्वतःच्या वापरासाठी तर काही जण व्यवसायासाठी कॉटन मॅक्सी खरेदी करतात. दरम्यान तुम्हीही होलसेल मध्ये कॉटन मॅक्सी खरेदी करून हा व्यवसाय सुरू करू शकतात.

दहा हजार रुपयांच्या गुंतवणुकीपासून तुम्हाला हा व्यवसाय सुरू करता येणार आहे. मालाड पश्चिमेतील मालाड शॉपिंग सेंटरमध्ये लक्ष्मी नाईटी येथे कॉटन मॅक्सी अगदी कमी दरात उपलब्ध होत आहेत. केवळ 110 रुपयांपासून सुरुवात होणाऱ्या या मॅक्सीची किंमत जास्तीत जास्त 425 रुपयांपर्यंत आहे. विशेष म्हणजे, हा माल बाहेरील रिटेल मार्केटमध्ये 1200 ते 1400 रुपयांपर्यंत विकला जातो. त्यामुळे घाऊक खरेदी करणाऱ्यांसाठी हा मोठा व्यवसायाचा पर्याय ठरतो. इथे साधी कॉटन मॅक्सी फक्त 110 रुपये, जाड क्वालिटी कॉटन 180 रुपये, प्युअर किंवा बाटी कॉटन 180–200 रुपये, एम्ब्रॉयडरी वर्क व प्रिंटवर्क मॅक्सी 210 रुपये, तसेच कश्मीरी वर्क व प्लेन मॅक्सी 210 रुपये दराने मिळतात. याशिवाय जयपुरी कॉटन (डबल साईड शिलाई व पॉकेटसह) 260 रुपये, तर मार्केटमध्ये 1200–1400 रुपयांना मिळणारी हाय क्वालिटी मॅक्सी इथे केवळ 425 रुपयांत उपलब्ध आहे.

ग्राहकांना प्रत्येक सेटमध्ये 6 किंवा 12 पीस घ्यावे लागतात. एका सेटमध्ये सहा वेगवेगळे रंग मिळतात. त्यामुळे खरेदी करणाऱ्यांना व्हरायटीचा फायदा होतो. व्यवसायाच्या दृष्टीने हा माल अतिशय फायदेशीर आहे. कमी गुंतवणुकीत घाऊक दराने खरेदी करून स्थानिक पातळीवर किंवा ऑनलाईन रिटेलमध्ये विक्री करता येते. साध्या मॅक्सीपासून ते हाय क्वालिटीपर्यंत सर्व प्रकार उपलब्ध असल्याने प्रत्येक बजेटच्या ग्राहकांसाठी विक्री सहज शक्य आहे. जर कमी गुंतवणुकीत बिजनेस करायचा असेल तर नक्कीच तुम्ही हा व्यवसाय करू शकता. तुम्ही गावा-गावांमध्ये जाऊन डोअर टू डोअर विक्री करायला काही हरकत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe