Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी राज्यातील महिलांसाठी नवीन योजना सुरू केली. लाडकी बहीण योजना असे याचे नाव. ही योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू झाली आहे. या अंतर्गत दरमहा महिलांना पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात आहे. म्हणजेच लाडकी बहिण योजनेसाठी पात्र महिलांना दरवर्षी 18 हजार रुपयांचा लाभ मिळतोय. खरंतर या योजनेची घोषणा जून 2024 मध्ये करण्यात आली. तसेच याचा लाभ जुलै 2024 पासून मिळतोय. या अंतर्गत आत्तापर्यंत एकूण 14 हप्ते देण्यात आले आहेत. योजनेचा 14वा हप्ता कालपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होत आहे. पण अनेकांकडून मागील काही महिन्याचे हफ्ते त्यांना मिळालेले नाहीत अशी तक्रार समोर येत आहे.
वास्तविक सरकारकडून सध्या अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे. ही योजना गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत सुरू झाली आणि यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात या योजनेचा सर्वच महिलांना लाभ मिळाला. काही अपात्र महिलांनी चुकीचे कागदपत्रे सादर करून या योजनेचा लाभ उचलला आहे. दरम्यान, आता सरकारकडून अशाच अपात्र महिलांना या योजनेतून वगळले जात आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी सरकारी कर्मचारी असतानाही या योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना जर ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला नसेल तर त्यांनी सर्वप्रथम आपले नाव योजनेत आहे की नाही? याची खात्री करायला हवी. दरम्यान आज आपण लाडकी बहिण योजनेच्याच्या यादीत नाव आहे की नाही हे महिलांना कसं चेक करता येणार याची माहिती जाणून घेणार आहोत.

लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाव आहे की नाही कस चेक करणार?
लाडकी बहिण योजनेच्या यादीत तुमचे नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम याच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला अंतिम यादी विभागात जाऊन आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि त्या ठिकाणी दिलेला कॅप्चा कोड टाकून मग तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेल्या ओटीपीच्या माध्यमातून लॉगिन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. अधिकृत वेबसाईटवर ओटीपी टाकून लॉगिन केल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचं नाव आहे की नाही हे तपासता येणार आहे. जर या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचाही हप्ता मिळणार आहे. तसेच यापुढील हप्ते देखील मिळत राहणार आहेत.