Upcoming IPO: पुढील आठवड्यात IPO करणार धमाल! बघा बाजारात एन्ट्री करणाऱ्या आयपीओंची यादी… लाखो कमवण्याची संधी

Published on -

Upcoming IPO:- शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणारे जे काही गुंतवणूकदार असतात त्याच्यापैकी बरेच जण हे आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. अगदी तुम्ही देखील शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असाल आणि एखाद्या कंपनीच्या आयपीओची तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण येत्या आठवड्यामध्ये शेअर बाजारात नवनवीन आयपीओ दाखल होणार आहेत व त्यामुळे या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठी संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. चला तर मग या लेखात आपण बघू की येत्या आठवड्यात कोणते आयपीओ बाजारात प्रवेश करणार आहेत.

पुढील आठवड्यात बाजारात येतील नवीन आयपीओ

1- व्हीएमएस टीएमटी- हा एक महत्त्वाचा आयपीओ असून हा गुंतवणूकदारांसाठी 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान सुरू होणार आहे. यादरम्यान ही कंपनी 1.5 कोटी नवीन शेअर्स जारी करणार आहे व यातून 148.50 कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. याकरिता कंपनीने किंमत पट्टा 94 ते 99 रुपये दरम्यान ठेवला आहे व एका शेअर्स लॉट मध्ये 150 शेअर्स असणार आहेत. म्हणजेच गुंतवणूकदारांना कमीत कमी 14850 रुपयांचे गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

2- एसएमई सेगमेंटमधील आयपीओ- पुढील आठवड्यामध्ये एसएमई सेगमेंट मध्ये देखील महत्त्वाचे आयपीओ येणार असून यामध्ये टेकडी सायबर सिक्युरिटी, संपत अल्युमिनियम आणि जेडी केबल्स या IPO चा समावेश आहे. यातील संपत अल्युमिनियमचा आयपीओ हा 17 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत खुला असणार आहे. तसेच जेडी केबलचा आयपीओ 18 सप्टेंबर रोजी उघडणार असून यातून ही कंपनी 95.99 कोटी रुपये उभारणार आहे व 12 सप्टेंबर पर्यंत या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येणार आहे. यासाठीचा किंमत पट्टा हा 144 ते 152 रुपये असून लॉट साईज 800 शेअर्सची आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना किमान दोन लाख 43 हजार दोनशे रुपये गुंतवावे लागणार आहेत. तसेच यामधील टेकडी सायबर सिक्युरिटी लिमिटेड आयपीओ हा 15 सप्टेंबरला लॉन्च होणार आहे व 17 सप्टेंबर पर्यंत खुला राहणार आहे. यासाठीचा किंमत पट्टा 183 ते 193 रुपये निश्चित करण्यात आला असून एका लॉटमध्ये गुंतवणूकदारांना 600 शेअर्स करिता बोली लावणे गरजेचे आहे.

3- युरो प्रतीक सेल्स- हा आयपीओ 16 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे व 18 सप्टेंबर पर्यंत खुला राहणार आहे. या माध्यमातून कंपनीचा 401.31 कोटी रुपये भरायचा मानस आहे. याकरिता किंमत पट्टा 235 रुपये ते 247 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आला असून एका लॉटमध्ये 60 शेअर्स असणार आहेत. म्हणजेच गुंतवणूकदारांना किमान 14820 रुपये गुंतवावे लागणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News