NSDL Share: NSDL चा शेअर खरेदी करावा का? काय म्हणतात तज्ञ? दिली पुढील टार्गेट प्राईस

Published on -

NSDL Share:- आपण जर सध्याच्या आठवड्यामध्ये शेअर बाजाराची कामगिरी बघितली तर ती अतिशय सकारात्मक आणि तेजीत असल्याचे दिसून आले. सुरुवातीच्या कालावधीमध्ये काहीसा चढउतार जाणवला. परंतु त्यानंतर मार्केटने रिकव्हरी करून जोरदार उसळी घेतल्याचे चित्र आपल्याला शुक्रवार पर्यंत पाहायला मिळाले. यामध्ये बऱ्याच कंपन्यांचे शेअर्समध्ये देखील उसळी पाहायला मिळाली. परंतु काही शेअर्स या कालावधीत घसरताना देखील दिसले व यामध्ये आपल्याला नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड अर्थात एनएसडीएल शेअरचा देखील समावेश करावा लागेल. कारण शुक्रवारी जेव्हा बाजार बंद झाला तेव्हा हा शेअर 0.87% ने घसरला व 1280.65 रुपयांवर बंद झाला. या सगळ्या पार्श्वभूमीवर एनएसडीएल शेअर्समध्ये गुंतवणूक करावी की नाही हे समजून घेणे देखील फायद्याचे आहे. चला तर मग या संबंधी एक्सपर्ट काय म्हणतात हे आपण जाणून घेऊ.

एनएसडीएलची आर्थिक स्थिती कशी आहे?

जर आपण ह्या कंपनीचा निव्वळ नफा बघितला तर तो पहिल्या तिमाही मध्ये 15.16 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आलेले आहे. साधारणपणे एप्रिल ते जून या कालावधीत एनएसडीएलचा निव्वळ नफा 89.62 कोटी रुपयांच्या दरम्यान होता. या कालावधीतील कंपनीचा नफा बघितला तर तो 77.82 कोटी रुपये होता व यावरून आपल्याला दिसून येते की कंपनीच्या नफ्यात यावर्षी वाढ झालेली आहे. महसुलामध्ये वाढ झालेली असली तरी देखील मात्र महसूल आघाडीवर या कंपनीला मोठा धक्का बसलाय. यासंबंधी आकडेवारी बघितली तर या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीमाहीत कंपनीचा महसूल 312.02 कोटी रुपये होता व वार्षिक आधारावर बघितले तर कंपनीच्या महसुलामध्ये 7.49 टक्क्यांची घट झाल्याचे दिसून येत आहे. कारण गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत कंपनीचा महसूल 337.29 कोटी रुपये होता. तसेच पहिल्या तिमाहीत या कंपनीचा खर्च हा 228.03 कोटी रुपये इतका होता.

तज्ञांचे मत काय?

एनएसडीएलच्या शेअरबाबत तज्ञांचे मत बघितले तर हा शेअर घसरणीत देखील खरेदी केला जाणे फायद्याचे ठरू शकते. एक्सपर्ट्सने या शेअरकरिता 1250 रुपयांची सपोर्ट प्राईस दिलेली आहे व 1335 रुपयांचा रेजिस्टन्स देण्यात आला आहे. या रेजिस्टन्स पातळीच्या वर जर हा शेअर गेला तर तो 1400 रुपयांच्या लेव्हलवर जाईल अशी शक्यता देखील तज्ञांनी व्यक्त केलेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe