PG Electroplast Share: 5 वर्षात 1 लाखाचे झाले 1 कोटी! बघा ‘या’ इलेक्ट्रिक कंपनीच्या शेअरची कमाल

Published on -

PG Electroplast Share:- शेअर बाजारातील अस्थिरतेच्या कालावधीमध्ये अनेक कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांच्या पैशांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. परंतु असे काही शेअर्स आहेत की त्यांनी सध्या देखील चांगला परतावा दिला आहे व दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून बघितले तर गुंतवणूकदारांच्या लाखोच्या गुंतवणुकीचे रूपांतर कोटी रुपयांमध्ये केलेली आहे. यामध्ये जर आपण एक शेअर बघितला तर तो म्हणजे पीजी इलेक्ट्रोप्लास्ट कंपनीचा शेअर होय.

पीजी इलेक्ट्रोप्लास्टने पाच वर्षात गुंतवणूकदारांना केले मालामाल

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पीजी इलेक्ट्रोप्लास्ट एक आघाडीची इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्विस कंपनी असून ही कंपनी एअर कंडिशनर तसेच वाशिंग मशीन, एलईडी टीव्ही, कुलर आणि प्लास्टिक कंपोनन्ट्स बनवण्याचे काम करते. या कंपनीच्या शेअरने गेल्या पाच वर्षात गुंतवणूकदारांना मल्टी बॅगर रिटर्न दिले असून शेअर्समध्ये या कालावधीत तब्बल 11000 टक्क्यांहून अधिकची वाढ झाली आहे. म्हणजेच या कंपनीच्या शेअरमध्ये जर पाच वर्षांपूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर त्या एक लाखाचे रूपांतर आज एक कोटींपेक्षा अधिक झाले आहे. चार सप्टेंबर 2020 रोजी या कंपनीचा शेअर फक्त पाच रुपया किमतीवर होता. त्यात वाढ होत 12 सप्टेंबर 2025 ला या शेअरची किंमत बीएसई वर 570.05 रुपये इतकी राहिली. म्हणजेच पाच वर्षाच्या कालावधीत या शेअरमध्ये 11,265% पेक्षा जास्तीची तेजी दिसून आली आहे. म्हणजे चार सप्टेंबर 2020 ला या शेअरमध्ये एक लाखांची गुंतवणूक केली असती तर त्याचे मूल्य आज 1.14 कोटी रुपये झाले असते. तसेच 9 सप्टेंबर 2021 रोजी म्हणजे साधारण चार वर्षांपूर्वी या शेअरची किंमत 35.65 रुपये होती व या चार वर्षाच्या कालावधीत या शेअरने गुंतवणूकदारांना 1490 टक्क्यांनी परतावा दिलेला आहे. मात्र एक वर्षाच्या कालावधीत या कंपनीच्या शेअरमध्ये मात्र आठ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News