Bonus Shares:- आगामी आठवडा हा शेअर मार्केटसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार असून या आठवड्यात काही कंपन्यांची आयपीओ लॉन्च होणार आहेत तर काही कंपन्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देणार आहेत. त्यामुळे भागधारकांना आर्थिक दृष्टिकोनातून खूप मोठा फायदा या कालावधीत होणार आहे. चला तर मग आपण या लेखात बघू की अशा कोणत्या दोन कंपन्या आहेत की त्या त्यांच्या भागधारकांना बोनस शेअर्स देणार आहेत.
या कंपन्या भागधारकांना देतील बोनस शेअर्स
1- जीएचव्ही इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड- ही कंपनी वाहतूक पायाभूत सुविधा तसेच ऊर्जा आणि पर्यावरण प्रकल्प आणि त्यासोबतच सामाजिक आणि व्यावसायिक संकुल, कार्यालयीन इमारती आणि स्टील, ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल्स सारख्या क्षेत्रांमध्ये औद्योगिक प्रकल्पांची निर्मिती करण्याचे काम करते. ही कंपनी आपल्या भागाधारकांना दोन शेअर्सवर तीन बोनस शेअर्स देणार असून याकरिता कंपनीने 16 सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आहे. त्याच दिवशी कंपनीच्या शेअरचे 1:5 या रेशो मध्ये विभाजन देखील केले जाणार आहे व त्यामुळे शेअरची दर्शनी किंमत दोन रुपये होणार आहे.

2- गॉडफ्रे फिलिप्स इंडिया- या कंपनीची स्थापना 1844 मध्ये झालेली आहे व प्रमुख तंबाखू उत्पादक कंपनी म्हणून ओळखले जाते. या कंपनीचा मुख्य व्यवसाय देशांतर्गत सिगरेट उद्योगात असला तरी या कंपनीने चहा, पान मसाला आणि मिठाई सारख्या उत्पादनांमध्ये देखील विस्तार केलेला आहे. ही कंपनी देखील गुंतवणूकदारांना एका शेअरवर दोन बोनस शेअर्स देणार आहे. तसेच ऑगस्टमध्ये या कंपनीने भागीधारकांना प्रति शेअर साठ रुपये लाभांश दिला होता. तसेच ही कंपनी 16 सप्टेंबरला एक्स बोनस ट्रेड करणार आहे. शुक्रवारी या कंपनीच्या शेअरची बंद किंमत 10 हजार 409 रुपये इतकी होती.