Stock To Buy:- तुम्हाला देखील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल व तुम्ही चांगला परतावा देऊ शकेल अशा शेअरच्या शोधात असाल तर या लेखात दिलेली माहिती ही तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. आपल्याला माहित आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकतीच जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा करात कपात करण्यात आलेली आहे व या कपातीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ब्रोकरेज मोतीलाल ओसवालने लॉजिस्टिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा शेअर्स खरेदीसाठी निवडला आहे. त्याबद्दलचे थोडक्यात माहिती आपण बघू.
VRL लॉजिस्टिक्स शेअरसाठी असलेली टार्गेट प्राईस
प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने लॉजिस्टिक क्षेत्रातील महत्त्वाच्या असलेल्या व्हीआरएल लॉजिस्टिकचा शेअर्स खरेदीसाठी सिलेक्ट केला असून याबद्दल ब्रोकरेजेचे मत आहे की कंपनीचे लक्ष नफ्यात वाढ साध्य करण्यावर असून सध्या करण्यात आलेल्या जीएसटी कपातीमुळे त्यांच्या या प्रयत्नांना चालना मिळू शकणार आहे. जर आपण या शेअरची किंमत बघितली तर शुक्रवारी म्हणजेच 12 सप्टेंबर 2025 रोजी या शेअरमध्ये आठ रुपयांची वाढ दिसून आली व तो 279.55 रुपयांवर बंद झाला. प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या शेअर्सवर खरेदी म्हणजेच बाय रेटिंग दिले असून याकरिता पुढील टार्गेट प्राईस 350 रुपये निश्चित केलेली आहे. विशेष म्हणजे सध्याच्या किमतीपेक्षा ही प्राईस 29 टक्क्यांनी जास्त आहे.

व्हीआरएल लॉजिस्टिक शेअरची एका वर्षाची कामगिरी कशी?
व्हीआरएल लॉजिस्टिक शेअर्समध्ये एका वर्षामध्ये कुठलाही बदल पाहायला मिळालेला नाही व गुंतवणूकदारांना या शेअर्सने एक वर्ष कालावधीमध्ये आठ टक्के नकारात्मक परतावा दिलेला आहे. परंतु सध्या जर आपण बघितले तर एका आठवड्यात या शेअरमध्ये तेजी येईल असे संकेत दिसून येत आहेत व त्यामुळे त्याच्यात सहा टक्क्यांची वाढ ही शुक्रवारी दिसून आली.