महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवीन Railway मार्ग ! 100 मिनिटाचा प्रवास फक्त 60 मिनिटात; कसा असणार रूट ?

Published on -

Maharashtra New Railway : राज्याला लवकरच एका नव्या रेल्वे मार्गाची भेट मिळणार आहे. पनवेल – कर्जत या मार्गावरील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या पनवेल – कर्जत रेल्वे कॉरीडॉर प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

या मार्गाचे काम 79 टक्के होऊन अधिक पूर्ण झाले असून, मार्च 2026 पर्यंत हा मार्ग जनतेसाठी खुला होणार असल्याचे रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे. पनवेल ते कर्जत हा 29.6 किलोमीटरचा दुहेरी रेल्वे मार्ग मुंबई उपनगरी रेल्वेच्या विस्ताराचा एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 2,872 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

या नव्या मार्गामुळे पनवेल आणि कर्जत दरम्यानचा प्रवास वेळ 30 ते 40 मिनिटांनी कमी होणार आहे. प्रवासाचा एकूण कालावधी फक्त एक तासाच्या आत राहणार आहे. हा प्रकल्प मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प अंतर्गत एमआरव्हीसी मार्फत राबविला जात आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व पूल, बोगदे स्थानक इमारती आणि रेल्वे उड्डाणपूलाचे प्रमुख सिव्हिल कामे अंतिम टप्प्यात आहेत.

या प्रकल्पात आधुनिक अभियांत्रिकी डिझाईन सोबतच पर्यावरणीय बाबींनाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. वन मंजुरी मिळाल्यानंतर पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पनवेल – कर्जत कॉरिडॉरमध्ये नवीन स्थानकांची उभारणी, वीज पुरवठा यंत्रणा ,अत्याधुनिक सिग्नलिंग प्रणाली, तसेच प्रवाशांसाठी स्वच्छ प्रतीक्षा लय आणि पार्किंग सुविधा निर्माण करण्यात येत आहेत.

ही सर्व कामे 2025 च्या अखेरीस पूर्ण होतील, अशी माहिती एमआरव्हीसिकडून देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे पनवेल, नेरळ, रसायनिक, खोपोली आणि आसपासच्या भागात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. कर्जत हे सध्या एक महत्त्वाचे निवासी आणि औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होत आहे.

नवीन रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवास स्थानिक सुकर होईल. या प्रकल्पाच्या डिझाईनमध्ये पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. वनक्षेत्रातील परिणाम कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून पर्यावरण मंत्रालयाने सुद्धा या कामाला मंजुरी दिली आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सर्व चाचण्या आणि मंजुरी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जानेवारी ते मार्च 2026 दरम्यान प्रवासी सेवा सुरू करण्याची तयारी आहे. प्रारंभी दर तासाला काही गाड्या सुरू करून हळूहळू सेवेत वाढ केली जाईल. पनवेल – कर्जत रेल्वे सुरू झाल्यानंतर मुंबई उपनगरातील प्रवास वेळ 30 मिनिटांनी कमी होईल.

तसेच मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे नेटवर्क अधिक सशक्त होईल. या नव्या मार्गामुळे पनवेल- कर्जत लोणावळा या भागात दैनंदिन प्रवाशाची मोठी सोय होईल. हा प्रकल्प मुंबई आणि रायगड जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना देणारी राहणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या नव्या मार्गामुळे प्रवास वेळ, खर्च आणि प्रवासाचा त्रास कमी होणार आहे. या परिसरात औद्योगिक तसेच पर्यटन क्षेत्राला नवा वेग मिळणार आहे. प्राधिकरणाने मार्च 2026 पर्यंत सेवा सुरू करण्याचे लक्ष असून पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा पायाभूत प्रकल्प ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe