Post Office Scheme : सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का मग तुमच्यासाठी पोस्टाच्या बचत योजना फायद्याच्या ठरणार आहेत. दरम्यान आज आपण पोस्टाच्या अशा एका बचत योजनेची माहिती पाहणार आहोत जिथे काही रुपये गुंतवून लाखो रुपयांची कमाई करता येणार आहे.
पोस्टाच्या एका योजनेत गुंतवणूकदार डेली 333 रुपयांची गुंतवणूक करून काही दिवसातच 17 लाख रुपयांचा मोठा फंड तयार करू शकणार आहेत. पोस्ट ऑफिसकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरक्षित आणि सर्वसामान्यांना परवडतील अशा फायदेशीर बचत योजना राबविल्या जातात.

याच योजनांपैकी एक लोकप्रिय आणि विश्वासार्ह योजना म्हणजे पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) योजना. दरम्यान आज आपण याच योजनेची थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींनाही या योजनेत छोटी मोठी गुंतवणूक करून लाखो रुपयांचा फंड तयार करता येऊ शकतो. खरेतर, नियमित बचत करता यावी, या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली असून, त्यावर सरकारकडून हमी असलेला चांगला व्याजदर पण दिला जातोय.
योजनेचे व्याजदर कसे आहे ?
आरबीआय कडून रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली असल्याने बँकांचे एफडी व्याजदर कमी होत चालले आहे. सध्या पोस्ट ऑफिस RD योजनेवर 6.7 टक्के वार्षिक व्याजदर दिला जात आहे.
विशेष म्हणजे या योजनेत फक्त 100 रुपयांपासून खाते सुरू करता येते. कोणतीही व्यक्ती हे खाते उघडू शकते, तसेच 10 वर्षांवरील मुलांच्या नावानेही RD खाते उघडण्याची मुभा आहे. मात्र, संबंधित मुलाचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर नवीन केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
पोस्ट ऑफिस RD खाते ऑफलाइन पद्धतीसोबतच ई-बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारेही उघडता येते. ही योजना सुरुवातीला 5 वर्षांसाठी मॅच्युअर होते. मॅच्युरिटीच्या वेळी खातेदार पैसे काढू शकतो किंवा इच्छेनुसार ही योजना पुढील 5 वर्षांसाठी वाढवू शकतो.
म्हणजेच, एकूण 10 वर्षे गुंतवणूक सुरू ठेवण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच खाते सुरू झाल्यानंतर 3 वर्षे पूर्ण झाल्यावर प्री-मॅच्युअर क्लोजर करण्याचाही पर्याय दिला जातो. या योजनेत छोटी गुंतवणूक करून मोठी रक्कम जमा करणे शक्य आहे.
उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने दररोज साधारण 333 रुपये (म्हणजे महिन्याला 10 हजार रुपये) गुंतवले, तर 5 वर्षांत 6 लाख रुपये जमा होतील. त्यावर 6.7 टक्के व्याजदराने सुमारे 1.13 लाख रुपये व्याज मिळते. हीच योजना पुढील 5 वर्षांसाठी वाढवल्यास, एकूण रक्कम 17.08 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कर्ज सुविधा. खाते सुरू झाल्यानंतर 1 वर्ष पूर्ण झाल्यावर, जमा रकमेच्या 50 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकते. या कर्जावर संबंधित व्याजदराच्या तुलनेत 2 टक्के अतिरिक्त व्याज आकारले जाते.
पोस्ट ऑफिस RD खाते उघडण्यासाठी नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करता येतो. अर्जासोबत फोटो, ओळख व पत्ता पुरावा, तसेच नामनिर्देशनाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. सुरक्षितता, सरकारी हमी आणि नियमित बचतीची सवय लावण्यासाठी पोस्ट ऑफिसची ही योजना अनेकांसाठी उत्तम पर्याय ठरत आहे.