Tata Share Price : नव्या वर्षात तुम्हालाही तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये काही नवीन कंपन्यांचे शेअर्स ॲड करायचे असतील तर आजची ही बातमी तुमच्यासाठी उपयोगाची ठरणार आहे. खरे तर 2025 हे वर्ष आता अंतिम टप्प्यात आले आहे आणि हे चालू वर्ष शेअर मार्केट साठी चढउताराचे राहिले आहे.
मात्र या चढउताराच्या काळात सुद्धा शेअर मार्केट मधील काही शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून दिला आहे. अशातच आता टॉप ब्रोकरेज कडून येत्या काही दिवसांनी टाटा समूहाचे दोन शेअर्स गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देणार असा अहवाल जारी करण्यात आला आहे.

खरे तर 2025 मध्ये टाटा समूहाचे काही शेअर्स गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय ठरलेत. या वर्षात टाटा समूहाच्या काही शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाले आणि यामुळे गुंतवणूकदारांचे फार मोठे नुकसान पण झाले.
मात्र आता टाटा समूहाचे दोन शेअर्स येत्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देतील असा विश्वास टॉप ब्रोकरेज कडून व्यक्त करण्यात आला आहे.
टाटा समूहाचे दोन शेअर्स देणार जबरदस्त रिटर्न
व्होल्टास लिमिटेड : टाटा समूहाची ही कंपनी येत्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला नफा देऊ शकते. BofA सिक्युरिटीजकडून या कंपनीच्या शेअर्ससाठी बाय रेटिंग देण्यात आली आहे म्हणजेच हा शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
खरे तर आधी टॉप ब्रोकरेज कडून या कंपनीच्या शेअर्स साठी अंडर परफॉर्म रेटिंग देण्यात आली होती मात्र आता ही रेटिंग बाय वर अपग्रेड करण्यात आली आहे. तसेच या शेअर साठी 1555 रुपयांची टार्गेट प्राईज निश्चित करण्यात आली आहे.
शेअरच्या करंट मार्केट प्राइस चा विचार केला असता ही टारगेट प्राईज 12 ते 13 टक्के अधिक आहे. थोडक्यात या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना येत्या काळात 13% पर्यंत रिटर्न देऊ शकतात असा अंदाज देण्यात आला आहे.
खरे तर गेल्या 12-13 महिन्यांच्या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये मोठीचरण पाहायला मिळाली आहे. मागील बारा महिन्यांच्या काळात कंपनीचे शेअर जवळपास 23 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत आणि यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसलाय. मात्र आता 2026 मध्ये या कंपनीचे शेअर्स 13 टक्क्यांपर्यंत वाढतील असा अंदाज आहे.
टाटा मोटर्स सीव्ही : टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल कंपनीचे शेअर्स येत्या काळात गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देतील अशी शक्यता आहे. बोफा सिक्युरिटीजने हा शेअर्स 2026 मध्ये गुंतवणूकदारांना 23 टक्के रिटर्न देण्याची क्षमता ठेवतो असा अंदाज दिला आहे. यासाठी 475 रुपयांची टार्गेट प्राईस सुद्धा निश्चित करण्यात आली आहे.