Stock To Buy : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. तुम्ही पण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. आज आपण अशा काही शेअर्सची माहिती पाहणार आहोत जे की येत्या काळात गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देण्याची क्षमता ठेवतात.
गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढ-उतार सुरू आहे आणि याचा गुंतवणूकदारांना मोठा फटका बसतोय. गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये होणाऱ्या या चढ-उतारामुळे पूर्णपणे अस्वस्थ झाले आहेत आणि कोणत्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करावे हे त्यांना सुचत नाहीये.

अशातच आता टॉप ब्रोकरेज मोतीलाल ओसवाल यांनी टॉप तीन शेअर्स सुचवले आहेत जे की गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देण्याची कुवत ठेवतात. ऑटो हॉटेल आणि हेल्थकेअर या तीन सेक्टरमधील हे शेअर्स येत्या काळात गुंतवणूकदारांना नक्कीच चांगले रिटर्न देणार असा टॉप ब्रोकरेजचा अंदाज आहे.
हे शेअर्स गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल
एसबीआय लाईफ इन्शुरन्स : तुम्ही एखाद्या हेल्थकेअर सेगमेंट मधील शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एसबीआय लाइफ इन्शुरन्सचा पर्याय बेस्ट राहणार आहे कारण की मोतीलाल ओसवाल यांनी या शेअर्ससाठी बाय रेटिंग जाहीर केली आहे.
टॉप ब्रोकरेजने या शेअर साठी 2240 रुपयांची टार्गेट प्राईज जाहीर केली आहे. मोतीलाल ओसवाल यांच्या मते या कंपनीचे शेअर्स येत्या काळात सुद्धा आपली आघाडी टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरणार आहे.
कंपनीच्या संरक्षणात्मक आणि नॉन पार्टिसिपेटिंग प्रोडक्टच्या विक्रीमध्ये अलीकडील काही महिन्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि येत्या काळात या सेगमेंटमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे डिजिटल सोर्सिंग आणि ग्राहकांमधील विम्याबद्दल वाढते जागरूकता हे सुद्धा या शेअरच्या वाढीसाठी प्रमुख कारण ठरण्याची शक्यता आहे.
लेमन ट्री हॉटेल्स : हॉटेल क्षेत्रातील ही कंपनी येत्या काळात गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देणार असा अंदाज आहे. या शेअर्ससाठी 200 रुपये टार्गेट प्राईस सेट करण्यात आली आहे. नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ या कंपनीच्या महसूलवाढीसाठी फायद्याचे राहणार आहे. तसेच अटल सेतू अन औरिका प्रकल्प सुद्धा कंपनीच्या वाढीसाठी फायद्याचे ठरणार आहेत.
एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज : ऑटो सेक्टर मधील शेअर्स खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर हे शेअर्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. मोतीलाल ओसवाल कडून या शेअर साठी 3215 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. ऑटो सेक्टर मधील ही कंपनी वाहनांचे सुटे पार्ट बनवते.
आता या कंपनीकडून दुचाकी सोबतच चार चाकी वाहनांचे सुटे भाग सुद्धा बनवले जाणार आहेत. यामुळे कंपनीच्या वाढीसाठी सकारात्मक परिस्थिती तयार होत आहेत. साहजिकच त्याचा फायदा शेअर मार्केट गुंतवणूकदारांना सुद्धा होऊ शकतो.