‘हा’ आहे शेअर मार्केटचा धुरंदर स्टॉक ! 5 वर्षात दिलेत 19000 टक्के रिटर्न, दोन रुपयांच्या स्टॉकने बनवलं श्रीमंत

Multibagger Share : गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढ-उतार होत आहेत आणि या चढ-उताराचा गुंतवणूकदारांना मोठा फटका बसतोय. शेअर मार्केट मधील मंदीचा लाखो गुंतवणूकदारांना फटका बसलाय आणि हजारो कोटी रुपये पाण्यात गेले आहेत.

मात्र या चढउताराच्या काळात सुद्धा असे काही शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना कमालीचे रिटर्न दिले आहेत. अशाच मल्टिबॅगर शेअर्सच्या यादीत इंडो थाई सेक्युरिटीचा समावेश होतो.

या कंपनीचे शेअर्स पाच वर्षांपूर्वी फक्त दोन रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करत होते मात्र आजच्या घडीला या कंपनीचा स्टॉक 360 रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय. यामुळे शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी हा स्टॉक एक मोठा वेल्थ क्रियेटर ठरला आहे.

खरतर शेअर मार्केट गुंतवणूकदारांना नेहमी लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो कारण लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूकदारांना नेहमीच चांगले लाभ मिळत असतात. इंडो थाई सेक्युरिटीच्या शेअर्सने सुद्धा अशीच जबरदस्त कामगिरी केली आहे.

मागील पाच वर्षांच्या काळात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 19 हजार टक्के रिटर्न दिले आहेत आणि म्हणूनच आज आपण या शेअरची शेअर मार्केट मधील गेल्या पाच वर्षांची कामगिरी कशी राहिली आहे याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मागील दोन वर्ष ठरलेत गुंतवणूकदारांसाठी खास

 मागील वर्षात अर्थात 2024 मध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 400 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न दिलेत. मिळालेल्या माहितीनुसार एक जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 455% रिटर्न दिले आहेत.

2025 मध्ये देखील या शेअरची अशीच घोडदौड कायम राहिली आहे. या वर्षात आत्तापर्यंत या कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 186% रिटर्न मिळाले आहेत.

एका लाखाचे झालेत दोन कोटी रुपये

या शेअर्समध्ये पाच वर्षांपूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि आत्तापर्यंत ही गुंतवणूक होल्ड करून ठेवली असेल तर त्या गुंतवणूकदाराचे गुंतवणुकीचे एकूण मूल्य 1.95 कोटी रुपये म्हणजे जवळपास दोन कोटी रुपये झाले असेल.

दरम्यान यावर्षी जुलैमध्ये कंपनीने आपल्या शेअरचे विभाजन सुद्धा केले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने या शेअरचे 1:10 च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला होता.

खरे तर जुलै 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत हा स्टॉक जबरदस्त तेजीत दिसला मात्र त्यानंतर काही काळ या स्टॉक मध्ये मोठी मंदी दिसून आली. फेब्रुवारी 2025 नंतर जवळपास सहा महिने या स्टॉक मध्ये मंदी दिसून आली होती आणि या कालावधीत या शेअरच्या किमतीत 21 टक्क्यांची कपात झाली.

परंतु सप्टेंबरपासून पुन्हा एकदा या शेअरच्या किमती वाढू लागल्यात. सप्टेंबर 2025 मध्ये या शेअरच्या किंमतीत 78 टक्क्यांची आणि ऑक्टोबर महिन्यात या शेअरच्या किंमतीत 48 टक्क्यांची मोठी वाढ झाली.