360 दिवसात गुंतवणूकदारांचे पैसे झालेत दुप्पट! आता कंपनी देणार बोनस शेअर्स, कंपनीकडून किती मोफत शेअर्स मिळणार ? वाचा…

Bonus Share : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे बहुतांशी लोक मोफत शेअर्स देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा ठेवतात. दरम्यान जर तुम्ही ही मोफत शेअर्स वितरित करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे शेअर बाजारातील एक कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वितरित करणार आहे. खरे तर या कंपनीने अवघ्या बारा महिन्यांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. यामुळे आधीच या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत आहेत आणि त्यातच आता या कंपनीकडून मोफत शेअर्स वाटपाची घोषणा करण्यात आली आहे आणि म्हणूनच कंपनीचे शेअर्स आता फोकस मध्ये आहेत.

खरेतर, योग्य वेळी योग्य शेअर निवडला, तर गुंतवणूकदारांना कमी दिवसात सुद्धा चांगला नफा मिळू शकतो. याचेचं ताजे उदाहरण आहे जीआरएम ओव्हरसीज लिमिटेडचे शेअर्स. या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मागील बारा महिन्यांच्या काळात जबरदस्त रिटर्न मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मागील बारा महिन्यांमध्ये कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.

गुंतवणूकदारांना किती बोनस शेअर्स मिळणार 

जीआरएम ओव्हरसीजने आपल्या शेअर होल्डर्स साठी मोफत शेअर्स वितरित करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून कंपनीच्या निर्णयानुसार आता 2:1 या प्रमाणात बोनस शेअर्स दिले जाणार आहेत.

म्हणजेच, ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचा एक शेअर आहे, त्यांना त्यावर अतिरिक्त दोन शेअर्स बोनस स्वरूपात मिळणार आहेत. कंपनीने यासाठी बुधवार, 24 डिसेंबर ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. रेकॉर्ड तारखेपर्यंत ज्यांच्या डीमॅट खात्यात शेअर्स असतील, तेच गुंतवणूकदार या बोनससाठी पात्र ठरणार आहेत.

कंपनीकडून बोनस शेअर्सचे वाटप शुक्रवार, 26 डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घोषणेनंतर शेअर बाजारात जीआरएम ओव्हरसीजच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. शुक्रवारी कंपनीचा शेअर 475 रुपये या उच्चांकी पातळीवर व्यवहार करत होता. गेल्या एका वर्षात या शेअरने तब्बल 139 टक्के परतावा दिला आहे. तर केवळ 2025 या वर्षात आतापर्यंत सुमारे 135 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

मागील तीन महिन्यांचा विचार केला असता, या शेअरने जवळपास 33 टक्क्यांची रॅली केली आहे. कंपनीच्या आर्थिक कामगिरीकडे पाहिल्यास, दुसऱ्या तिमाहीत जीआरएम ओव्हरसीजने दमदार निकाल सादर केले आहेत. कंपनीचा महसूल 16.2 टक्क्यांनी वाढून 372.1 कोटी रुपये झाला आहे.

यामागे बासमती तांदळाच्या निर्यातीत झालेली 72 टक्क्यांची वाढ हे प्रमुख कारण आहे. तसेच, कंपनीचा निव्वळ नफा (PAT) मागील वर्षीच्या 9.2 कोटी रुपयांवरून 60.5 टक्क्यांनी वाढून 14.8 कोटी रुपये इतका झाला आहे.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मजबूत उपस्थिती आणि वाढती निर्यात यामुळे कंपनीची प्रगती वेगाने होत आहे. एकूणच, मजबूत आर्थिक स्थिती, बोनस शेअर्सची घोषणा आणि निर्यातीतली वाढ यामुळे जीआरएम ओव्हरसीज सध्या गुंतवणूकदारांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे.