‘या’ कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना देणार 80% पर्यंत रिटर्न ! 2026 मध्ये ‘हे’ 5 शेअर्स ठरतील वरदान

Share Market News : शेअर मार्केटमध्ये गत काही महिन्यांपासून सातत्याने चढ-उतार सुरू आहे आणि याचा गुंतवणूकदारांवर मोठा विपरीत परिणाम होतोय.

अशा परिस्थितीत जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार असाल तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये काही नवीन शेअर्स ऍड करणार असाल तर आज आम्ही तुम्हाला देशातील आघाडीच्या ब्रोकरेज संस्थाकडून सुचवण्यात आलेल्या काही शेअर्स बाबत माहिती सांगणार आहोत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आघाडीच्या ब्रोकरेज संस्थांनी रिअल इस्टेट, एफएमसीजी, संरक्षण, ऊर्जा आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील काही निवडक शेअर्सवर सकारात्मक भूमिका घेतली आहे.

या ब्रोकरेज अहवालांनुसार, लोढा डेव्हलपर्स, अदानी पॉवरसह एकूण पाच कंपन्यांच्या शेअर्समध्ये आगामी काळात 23 टक्क्यांपासून ते तब्बल 77 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही एक आकर्षक संधी मानली जात आहे.

अ‍ॅस्ट्रा मायक्रोवेव्ह प्रॉडक्ट्स लिमिटेड : संरक्षण क्षेत्राशी संबंधित अ‍ॅस्ट्रा मायक्रोवेव्ह प्रॉडक्ट्स लिमिटेड या कंपनीवर मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने सकारात्मक कौल दिला आहे. कंपनीसाठी 1100 रुपयांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून सध्या हा शेअर सुमारे 892 रुपयांवर व्यवहार करत आहे. यामध्ये सुमारे 23 टक्के वाढीची शक्यता आहे. ही कंपनी संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रासाठी मायक्रोवेव्ह घटक व यंत्रणा विकसित करते. रडार आणि टेलिमेट्री प्रणालीतील कंपनीचे कौशल्य तिची प्रमुख ताकद मानली जाते.

अदानी पॉवर : ऊर्जा क्षेत्रातील अदानी पॉवर या शेअरवर अँटीक ब्रोकरेजने कव्हरेज सुरू करत 187 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. सध्या हा शेअर 143 रुपयांच्या आसपास असून यात जवळपास 30 टक्के नफ्याची संधी दिसून येते. अदानी समूहाचा भाग असलेली ही कंपनी देशातील सर्वात मोठ्या खासगी औष्णिक ऊर्जा उत्पादकांपैकी एक आहे.

व्हीआरएल लॉजिस्टिक्स लिमिटेड : लॉजिस्टिक्स क्षेत्रातील व्हीआरएल लॉजिस्टिक्स लिमिटेड या कंपनीच्या शेअरवरही ब्रोकरेज संस्थांचा विश्वास आहे. या शेअरचे लक्ष्य 350 रुपये देण्यात आले असून सध्याची किंमत 266 रुपये आहे. त्यामुळे यात सुमारे 32 टक्के वाढ अपेक्षित आहे.

लोढा डेव्हलपर्स : रिअल इस्टेट क्षेत्रातील लोढा डेव्हलपर्स (मॅक्रोटेक डेव्हलपर्स) या शेअरवर सर्वाधिक तेजीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मोतीलाल ओसवाल यांनी 1888 रुपयांचे लक्ष्य दिले असून सध्या हा शेअर 1063 रुपयांवर आहे. यामुळे गुंतवणूकदारांना तब्बल 77 टक्के परताव्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुण्यातील निवासी व व्यावसायिक प्रकल्पांमुळे कंपनी ओळखली जाते.

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड : एफएमसीजी क्षेत्रातील गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड या शेअरवरही खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. सध्याची किंमत 1180 रुपये असून सुधारित लक्ष्य 1450 रुपये ठेवण्यात आले आहे. साबण, केसांचे रंग आणि कीटकनाशके या उत्पादनांमध्ये कंपनीचा भक्कम दबदबा आहे. एकूणच, विविध क्षेत्रांतील या पाच शेअर्सवर ब्रोकरेज संस्थांचा सकारात्मक दृष्टिकोन असून मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हे शेअर्स फायदेशीर ठरू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.