पोस्टाची ‘ही’ योजना गुंतवणूकदारांना बनवणार श्रीमंत, 5 वर्षात मिळणार 15 लाख रुपये, पहा डिटेल्स

Post Office Scheme : सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजची बातमी खास ठरणार आहे. खरे तर अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे.

मात्र अनेकांना शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये असणारी जोखीम आवडत नाही. अनेकजण शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक रिस्की असल्याचे मानतात आणि म्हणूनच बँकांच्या FD योजनांमध्ये किंवा पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवतात.

दरम्यान आज आपण पोस्टाच्या एका लोकप्रिय बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट (NSC) योजना ही सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा देणारी गुंतवणूक म्हणून ओळखली जाते.

कोणताही धोका न पत्करता भविष्यासाठी निधी उभारायचा असेल, तर ही योजना सामान्य गुंतवणूकदारांसाठी उत्तम पर्याय मानली जाते. या योजनेला भारत सरकारची थेट हमी असल्याने गुंतवलेला पैसा पूर्णपणे सुरक्षित राहतो.

सध्या NSC योजनेवर 7.7 टक्के वार्षिक व्याजदर दिला जात आहे. हा व्याजदर कंपाऊंडिंग पद्धतीने लागू होतो, त्यामुळे गुंतवणूकदारांना दीर्घकालीन फायदा मिळतो.

उदाहरणार्थ, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत 10 लाख रुपये गुंतवले, तर 5 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीनंतर सुमारे 14.49 लाख रुपये मिळू शकतात. म्हणजेच, केवळ व्याजातूनच जवळपास 4.5 लाख रुपयांचा नफा मिळतो.

NSC ची मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम 1,000 रुपये असून, गुंतवणुकीवर कोणतीही कमाल मर्यादा नाही.

त्यामुळे गुंतवणूकदार आपल्या आर्थिक क्षमतेनुसार कितीही रक्कम गुंतवू शकतात. बाजारातील चढ-उतारांपासून दूर राहून स्थिर परतावा हवा असणाऱ्यांसाठी ही योजना विशेष फायदेशीर ठरते.

या योजनेचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे कर सवलत. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत वर्षाला 1.5 लाख रुपयांपर्यंत कर कपातीचा लाभ घेता येतो. तसेच, दरवर्षी जमा होणारे व्याज पुन्हा गुंतवणूक मानले जाते, त्यामुळे त्यावरही कर सवलतीचा फायदा मिळतो.

NSC खाते फक्त भारतीय निवासी नागरिकांनाच उघडता येते. एनआरआय, कंपन्या किंवा ट्रस्टना या योजनेत गुंतवणूक करण्याची परवानगी नाही. खाते एकट्याचे किंवा संयुक्त (जॉईंट) स्वरूपात उघडता येते.

10 वर्षांहून अधिक वयाची मुले स्वतःच्या नावाने खाते उघडू शकतात, तर 10 वर्षांखालील मुलांच्या नावे पालक खाते उघडू शकतात. सुरक्षितता, निश्चित परतावा आणि कर लाभ यांचा समतोल साधणारी पोस्ट ऑफिसची NSC योजना ही दीर्घकालीन आणि जोखीममुक्त गुंतवणूक शोधणाऱ्यांसाठी विश्वासार्ह पर्याय ठरत आहे.