लखपती बनवणारा फंड ! 10 लाखाचे झाले 65 लाख, ‘या’ Mutual Fund ने गुंतवणूकदारांना बनवले श्रीमंत

Mutual Fund : अलीकडे शेअर मार्केटमध्ये आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना थोडेसे नुकसान सहन करावे लागले आहे.

शेअर मार्केट मधील चढउताराचा फटका म्युच्युअल फंड मधील गुंतवणूकदारांना सुद्धा बसला आहे. मात्र लॉंग टर्म मध्ये शेअर मार्केट मधून तसेच म्युच्युअल फंडमधून गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळतोय.

दरम्यान आज आपण अशा एका म्युच्युअल फंडची माहिती पाहणार आहोत ज्याने एका दशकात म्हणजेच दहा वर्षांच्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचे रिटर्न दिले आहेत.

आम्ही ज्या म्युच्युअल फंड बाबत बोलत आहोत त्याने दहा वर्षांच्या काळात गुंतवणूकदारांच्या दहा लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य 65 लाख रुपयांपेक्षा अधिक बनवले आहे. अर्थात दहा वर्षांच्या काळात ह्या फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना सहापट रिटर्न दिले आहेत.

कोणता आहे तो म्युच्युअल फंड? 

निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप अस या म्युच्युअल फंडचे नाव. या म्युच्युअल फंड साठी 2025 हे वर्ष चिंतेचे राहिले आहे. या वर्षात या फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना निगेटिव्ह रिटर्न मिळाले आहेत.

मागील एका वर्षाच्या काळात या फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 8.33% इतके निगेटिव्ह रिटर्न मिळाले आहेत. परंतु लॉन्ग टर्म मध्ये हा फंड गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा राहिला आहे.

मागील दहा वर्षांचा विचार केला असता या फंडाने त्याच्या गुंतवणूकदारांना प्रभावी रिटर्न दिले आहेत. Nippon India Small Cap mutual Fund च्या डायरेक्ट योजनेने मागील दहा वर्षात 20.72% दराने रिटर्न दिले आहेत. त्याचवेळी मागील पाच वर्षात यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 28.17% दराने रिटर्न मिळाले आहेत.

गेल्या तीन वर्षांचा विचार केला असता यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 20.81% दराने रिटर्न मिळाले आहेत. यानुसार जा गुंतवणूकदारांनी या म्युच्युअल फंड योजनेत दहा वर्षांपूर्वी दहा लाख रुपयांची एक रकमी गुंतवणूक केली असेल त्या गुंतवणुकीचे मूल्य आजच्या घडीला 65.73 लाख रुपये इतके झाले असेल.

या म्युच्युअल फंडच्या होल्डिंग्जमध्ये एमसीएक्स, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, करूर वैश्य बँक, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, अपार इंडस्ट्रीज, टीडी पॉवर सिस्टम्स, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अ‍ॅक्सिस बँक अशा कंपन्यांचा समावेश आहे.