OYO IPO : शेअर मार्केट गुंतवणूकदारांचे आयपीओकडे विशेष लक्ष असते. गेल्या काही महिन्याच्या काळात विविध कंपन्यांचे आयपीओ आलेत. दरम्यान आता ओयो कंपनी आयपीओ आणण्यासाठी सज्ज झाली आहे.
या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या प्रस्तावाला नुकतीच एक महत्त्वाची मंजुरी सुद्धा मिळाली आहे. खरंतर ओयो ची मूळ कंपनी प्रिझम आयपीओ आणण्यासाठी सज्ज झाली असून ही कंपनी याद्वारे 6 हजार 650 कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहे.

दरम्यान या प्रस्तावित आयपीओला नुकतीच परवानगी मिळाली आहे. OYO च्या शेअर होल्डर्स कडून ही परवानगी देण्यात आली आहे. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. आयपीओसाठी शेअर होल्डर्स कडून मंजुरी मिळाली असल्याने आता कंपनीची सार्वजनिक बाजारातून वेळेवर भांडवल उभारण्याचे क्षमता बळकट होईल अशी माहिती तज्ञांकडून देण्यात आली आहे.
यामुळे आता ओयो आयपीओची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. खरंतर याआधी सुद्धा कंपनीने ipo ची तयारी केली होती मात्र दोन वेळा करण्यात आलेल्या प्रयत्नांना कंपनीला यश आले नाही. पण यावेळी कंपनीचा ipo 100% येणार अशी अपेक्षा आहे.
कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आयपीओला मंजुरी मिळाली असल्याने आता पुढील प्रक्रियेला वेग मिळणार आहे. प्रिझमच्या सार्वजनिक लिस्टिंगच्या तयारीतील हे एक महत्त्वाचे पाऊल राहणार आहे. कंपनीचा आयपीओ तर येणारच आहे सोबतच कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना फ्री शेअर्सचे सुद्धा वाटप करणार आहे.
गुंतवणूकदारांना मिळणार बोनस शेअर्स
आम्ही आपणास सांगू इच्छितो की वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याच्या प्रस्तावावर शिका मोर्तब केले आहे. पात्र 19 शेअर्ससाठी गुंतवणूकदारांना एक बोनस शेअर वितरित करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे.
तिसऱ्यांदा आयपीओची योजना
ओयोच्या मूळ कंपनीने याआधी दोनदा ipo ची योजना आखली होती. आता ही कंपनी तिसऱ्यांदा अशा प्रकारची योजना आखत आहे. मागील दोन आयपीओ योजना काही कारणास्तव अयशस्वी झाल्या आहेत.
2021 मध्ये कंपनीने पहिल्यांदा आयपीएस साठी अर्ज केला होता. मात्र हा अर्ज 2022 मध्ये मागे घेण्यात आला. पुढे 2023 मध्ये असाच अर्ज करण्यात आला आणि 2024 मध्ये हा पण अर्ज मागे घेण्यात आला.
आता कंपनी तिसऱ्यांदा ipo ची योजना आखत आहे आणि याला कंपनीच्या शेअर होल्डर्स कडून मान्यता सुद्धा मिळाली आहे. त्यामुळे आता कंपनीची ही योजना यशस्वी होणार का आणि कंपनीचा आयपीओ येणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.