Stock To Buy : वर्ष समाप्तीला आता फक्त काही दिवसांचा काळ बाकी आहे. सहा दिवसांनी नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. नव्या वर्षात प्रत्येकाने काही ना काही संकल्प घेतलेला असेल.
काही लोकांनी नव्या वर्षात गुंतवणुकीचा संकल्प घेतला असेल. दरम्यान तुम्हीही नवीन वर्षात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक खास माहिती घेऊन आलो आहोत.

आज आम्ही तुम्हाला 5 अशा शेअरची यादी देणार आहोत जे तुम्हाला पुढील बारा महिन्यांच्या काळात म्हणजेच एक जानेवारी 2027 पर्यंत लाखो रुपयांचे रिटर्न देण्याची क्षमता ठेवतात.
खरे तर वर्ष समाप्तेकडे असतानाच तसेच नाताळ आणि नववर्षाच्या उत्साहामुळे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात हालचाली पाहायला मिळतायेत. नाताळ तसेच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बाजार पुन्हा एकदा तेजीच्या दिशेने वाटचाल करताना दिसून येतोय.
अमेरिकेची बदललेल आर्थिक धोरण तसेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची पुन्हा होत असणारी गुंतवणूक यामुळे बाजारात पुन्हा एकदा सकारात्मक दृष्टिकोन पाहायला मिळतोय.
अमेरिकेचे संबंधित सकारात्मक व्यापार करार सुद्धा शेअर मार्केटमध्ये तेजी साठी कारणीभूत ठरतोय. दरम्यान अशा या तेजीच्या वातावरणात तुम्हाला मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला मार्केटमधील तज्ञांनी सुचवलेल्या टॉप 5 शेअर्स बाबत माहिती देणार आहोत.
हे शेअर्स तुम्हाला बनवतील मालामाल
PRICOL : सनी अग्रवाल यांनी PRICOL साठी पण बाय रेटिंग दिलेली आहे. हा स्टॉक पण पुढील बारा महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळवून देऊ शकतो. या स्टॉकसाठी त्यांनी 815 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे.
LLOYDS Metal : यासाठी नरेंद्र सोलंकी यांच्याकडून बाय रेटिंग देण्यात आली आहे आणि 1610 रुपयांचे टार्गेट प्राईस दिलेले आहे.
KIMS : नरेंद्र सोळंकी यांनी हा देखील स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे आणि यासाठी त्यांनी 800 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे.
भारती एअरटेल : शेअर मार्केट विश्लेषक नरेंद्र सोळंकी यांनी या शेअर साठी 2500 रुपयांची टार्गेट प्राईज देण्यात आली आहे. पुढील बारा महिन्यांच्या काळात हा स्टॉक चांगले कामगिरी करताना दिसणारा असा विश्वास व्यक्त होतोय. यामुळे हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
HDFC Bank : हा शेअर पुढील बारा महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून देऊ शकतो. शेअर मार्केट विश्लेषक सनी अग्रवाल यांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. बाय रेटिंग देतानाच या स्टॉकसाठी 1,150 रुपयांची टार्गेट प्राइस सुद्धा सेट करण्यात आली आहे. बँकेच्या मुदत ठेवी आणि कर्ज पोर्टफोलिओची स्थिती चांगली असल्याने येत्या काळात यामधून गुंतवणूकदारांना फायदा होणार आहे.