Silver Price : सोन आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंसाठी 2025 हे वर्ष फारच खास राहिले. या दोन्ही मौल्यवान धातूमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना यावर्षी जबरदस्त रिटर्न मिळाले आहेत आणि आता 2026 मध्ये या धातूंची कामगिरी कशी राहणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
यावर्षी सोन्यापेक्षा चांदीमध्ये गुंतवणूक करणारा गुंतवणूकदारांना अधिक परतावा मिळाला आहे आणि यामुळे चांदीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असल्याचे चित्र सध्या बाजारात पाहायला मिळतय. अशातच आता गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी मोठी माहिती दिली आहे.

अग्रवाल यांनी आपल्या एक्स हॅण्डल वर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यांनी चांदीबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे. येत्या काळात चांदीचे भाव कसे राहतील या संदर्भात त्यांच्या या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. 2025 मध्ये चांदीने सोन्यापेक्षा अधिक रिटर्न दिले आहेत.
चांदीने सोने, प्लॅटिनियम तसेच पॅलॅडियम या धातूंपेक्षा अधिक रिटर्न देण्याची किमया साधली आहे. आता चांदीमध्ये आलेल्या या तेजीवर वेदांत समूहाचे अध्यक्ष यांनी आपले मत व्यक्त केले आहे. अग्रवाल यांनी म्हटल्याप्रमाणे 2025 मध्ये चांदी सोन्याच्या छायेतून बाहेर पडली आहे.
चांदीसाठी हे वर्ष खूपच लाभदायक अन चांगले ठरले आहे. डॉलरच्या तुलनेत 2025 मध्ये आत्तापर्यंत चांदीच्या किमतीत थेट 125% वाढ झाली आहे. सोन्याबाबत बोलायचं झालं तर आत्तापर्यंत सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना 63% रिटर्न मिळाले आहेत.
चांदी सोबत तुलना केली असता हे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी आहे. म्हणजेच सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांपेक्षा चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांना यावर्षी अधिक नफा मिळाला आहे. अशातच आता वेदांता समूहाचे अध्यक्ष अग्रवाल यांनी चांदीची तेजी आगामी काळात सुद्धा अशीच कायम राहण्याची अशा यावेळी व्यक्त केली आहे.
चांदीच्या तेजीची ही एक सुरुवात आहे आणि पुढे पण ही तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. ते म्हणतात की, चांदी एक अद्वितीय धातू आहे.
कारण सोलार सेल्स असोत किंवा संरक्षण क्षेत्र प्रत्येक ठिकाणी याचा वापर होतो. नवीन तंत्रज्ञानामध्ये चांदीचा एक प्रमुख घटक म्हणून वापर केला जात आहे आणि यामुळे येत्या काळात चांदीचे भाव असेच वाढत राहण्याची शक्यता आहे.
अग्रवाल म्हणतात की चांदीची किंमत कमी जास्त होत राहणार आहे पण चांदीची चमक मात्र कायमच राहील. थोडक्यात औद्योगिक वापरामुळे चांदीला अधिक महत्त्व मिळत आहे. यामुळे येत्या काळात सुद्धा गुंतवणूकदारांना हा मौल्यवान धातू चांगला परतावा देतांना दिसणार आहे.