Banking News : जानेवारी महिना सुरू होण्यास आता फक्त काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. नव्या वर्षाच्या आगमनाची सध्या सगळीकडे आतुरता आहे. नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने देशभरातील बाजारपेठा सजल्या आहेत.
नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी अनेक जण पर्यटनस्थळांकडे आगेकूच करताना दिसतायेत. अशा स्थितीत बँकांमध्ये पण ग्राहकांची प्रचंड गर्दी वाढली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला अनेक जण नवीन मालमत्ता तसेच नवीन वाहन खरेदी करण्याचा प्लॅन बनवतात.

दरम्यान जर तुम्हीही नव्या वर्षाच्या निमित्ताने असाच काहीसा प्लॅन बनवत असाल आणि यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. कारण की जानेवारी 2026 मध्ये बँक सोळा दिवसांसाठी बंद राहणार.
स्वतः आरबीआयने या संदर्भातील माहिती आपल्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. आरबीआय ने आपल्या वेबसाईटवर जानेवारी 2026 मधील बँकांच्या सुट्ट्यांबाबत माहिती दिली आहे. जानेवारी महिन्यात बँका सोळा दिवस बंद राहतील पण या सर्व सुट्ट्या सगळीकडे सारख्या राहणार नाहीत.
याचा अर्थ एकाच वेळी सर्वच देशातील बँका बंद राहणार नाही. राज्यांनुसार आणि तेथील स्थानिक सण-उत्सवानुसार बँकांना सुट्टी मंजूर राहणार आहे. त्यामुळे, जानेवारी महिन्यात तुम्हाला बँकेत जायचे असेल तर तुम्ही तुमच्या राज्यातील बँक सुट्ट्यांबाबत माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.
जानेवारी महिन्यात या दिवशी बँका बंद राहणार
1 जानेवारी 2026 – नवीन वर्ष तसेच गान-नगाईनिमित्त मिझोराम, मणिपूर, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, पश्चिम बंगाल या राज्यांमधील बँकांना आरबीआयकडून सुट्टी देण्यात आली आहे.
2 जानेवारी 2026 – या दिवशी नववर्ष आणि मन्नम जयंतीनिमित्त केरळ तसेच मिझोराम राज्यातील सरकारी तसेच खाजगी बँकांना आरबीआयकडून सुट्टी देण्यात आले आहे.
3 जानेवारी 2026 – या दिवशी हजरत अली जयंतीनिमित्त यूपी मधील बँका बंद राहणार आहेत.
12 जानेवारी – स्वामी विवेकानंद जयंती असल्याने पश्चिम बंगालमधील बँकांना आरबीआयकडून सुट्टी मंजूर करण्यात आली आहे.
14 जानेवारी – मकर संक्रांती आणि माघ बिहू सणानिमित्त आसाम, ओडिशा, आणि अरुणाचल प्रदेश राज्यातील बँकांना आरबीआयकडून सुट्टी मंजूर करण्यात आली आहे.
15 जानेवारी – उत्तरायण पुण्यकाळ, पोंगल, माघे संक्रांती आणि मकर संक्रांती सणामुळे तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातील बँकांना सुट्टी देण्यात आली आहे.
16 जानेवारी – तिरुवल्लुवर दिन निमित्ताने तामिळनाडू राज्यातील बँकांना आरबीआयकडून सुट्टी मंजूर करण्यात आली आहे.
17 जानेवारी – उझावर थिरुनल सणामुळे तामिळनाडू राज्यातील बँकांना या दिवशी सुट्टी राहणार आहे.
23 जानेवारी – पश्चिम बंगाल, ओडिशा, आणि त्रिपुरा राज्यातील बँका या दिवशी बंद ठेवल्या जाणार आहेत.
26 जानेवारी – प्रजासत्ताक दिन निमित्ताने सर्व बँका बंद राहणार आहेत.
साप्ताहिक सुट्टीमुळे या तारखेला बँका बंद राहणार
4 जानेवारी – रविवार असल्याने सर्व बँका बंद राहणार आहेत.
10 जानेवारी – दुसरा शनिवार आहे म्हणून देशभरातील बँकांना सुट्टी राहणार आहे.
11 जानेवारी – रविवार असल्याने सर्व बँका बंद राहतील.
18 जानेवारी – रविवारी असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.
24 जानेवारी – चौथा शनिवार देशभरातील बँकांना सुट्टी राहणार आहे.
25 जानेवारी – रविवारनिमित्त संपूर्ण देशातील बँका बंद राहतील.