गुंतवणूकदारांना कमाईची सुवर्णसंधी ! ‘ही’ कंपनी देणार 23 मोफत शेअर्स, रेकॉर्ड डेट काय ?

Bonus Share News : शेअर मार्केट मधील कंपन्या वेळोवेळी आपल्या गुंतवणूकदारांसाठी कॉर्पोरेट लाभाच्या घोषणा करत असतात. अनेक गुंतवणूकदार कॉर्पोरेट लाभाच्या घोषणा करणाऱ्या कंपन्यांकडे लक्ष ठेवून असतात.

गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वितरित करणाऱ्या कंपन्या नेहमीच आपल्याकडे आकर्षित करतात आणि तुम्ही सुद्धा अशाच बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

शेअर मार्केट मधील एका मोठ्या एनबीएफसी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी मोफत शेअर्स वितरणाची घोषणा केली आहे. Magnanimous Trade & finance Ltd या मायक्रो कॅप श्रेणीतील कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 23 बोनस शेअर्स देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.

दरम्यान यासाठी कंपनीकडून रेकॉर्ड तारीख सुद्धा सेट करण्यात आली आहे आणि ही तारीख आता जवळ येऊ लागली आहे. यामुळे सध्या या कंपनीचे शेअर्स फोकस मध्ये आहेत.

बोनस शेअरसाठीची रेकॉर्ड तारीख काय?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की कंपनीच्या संचालक मंडळाने अलीकडेच आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला. 23:1 या प्रमाणात बोनस शेअर्स देण्यास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

याचाच अर्थ आता या कंपनीचा 1 पूर्ण भरलेला शेअर असेल तर बोनस म्हणून 10 रुपये दर्शनी मूल्याचे 23 नवीन शेअर्स मोफत मिळणार आहेत. कंपनीने जी रेकॉर्ड तारीख सेट केलेली आहे या तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांनाच या बोनस शेअरचा लाभ मिळणार आहे.

त्यासाठी कंपनीने दोन जानेवारी 2026 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केलेली आहे. म्हणजेच या बोनस शेअर चा लाभ घ्यायचा असेल तर शेअर मार्केट गुंतवणूकदारांना 1 जानेवारी 2026 पर्यंत शेअर्स खरेदी करावे लागणार आहेत.

खरे तर या आधी सुद्धा कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स दिलेले आहेत. स्टॉक एक्सचेंज कडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार 2013 मध्ये कंपनीने पहिल्यांदा आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स दिले होते.

म्हणजेच आता थेट बारा वर्षानंतर कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना दुसऱ्यांदा बोनस शेअरचे वाटप करणार आहे. 2013 मध्ये कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 3:1 च्या प्रमाणात मोफत शेअर्स दिले होते. सध्या स्थितीला या कंपनीचा स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर दहा रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करतोय.