फक्त 333 रुपयांची गुंतवणूक बनवणार लखपती ; 1700000 रुपये मिळणार, कशी आहे नवीन योजना?

Post Office Scheme : पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. पोस्ट ऑफिस लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत साऱ्यांसाठी बचत योजना राबवत आहे आणि या योजनांमधून सर्वसामान्य ग्राहकांना चांगले व्याज सुद्धा मिळते.

पोस्टाच्या अशा काही योजना आहेत जिथे शंभर रुपयांपासून गुंतवणूक करता येते आणि ही शंभर रुपयांची गुंतवणूक सुद्धा गुंतवणूकदारांना एक मोठा निधी तयार करून देते.

दरम्यान आज आपण अशाच एका बचत योजनेची माहिती पाहणार आहोत जिथे 333 रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदार लखपती होऊ शकतो. 333 रुपयांची गुंतवणूक देखील सामान्य गुंतवणूकदारांना 17 लाख रुपयांचे मालक बनवू शकते.

खरे तर गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये मोठी कपात केली आणि या निर्णयाचा फटका म्हणून बँकांच्या एफडी योजनांचे व्याजदर सुद्धा कमी झाले.

मात्र आजही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांचे व्याजदर कायम आहे आणि म्हणूनच अनेकजण एफडीऐवजी पोस्टाच्या बचत योजनांना महत्त्व दाखवत आहेत.

दरम्यान जर तुम्ही सुरक्षित तसेच चांगले रिटर्न देणाऱ्या बचत योजनेच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडी योजनेबाबत माहिती सांगणार आहोत.

कशी आहे पोस्टाची आरडी योजना?

या योजनेला सरकारच्या समर्थन आहे म्हणून येथे गुंतवलेला पैसा बुडत नाही. यातून गुंतवणूकदारांना 100% रिटर्न मिळतो. ही योजना पाच वर्षांची असते म्हणजेच पाच वर्षानंतर गुंतवणूकदारांना त्याने गुंतवलेली रक्कम आणि व्याज मिळते.

या योजनेत दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवावी लागते. यात गुंतवलेल्या रकमेवर पोस्टाकडून सद्यस्थितीला 6.7% दराने व्याज दिले जाते. आरबीआय ने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतरही पोस्टाच्या आरडी योजनेचे व्याजदर कायम आहेत.

त्यामुळे सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी पोस्टाची आरडी योजना एक बेस्ट ऑप्शन राहणार आहे. तुम्हाला पण दर महिन्याला एक छोटी रक्कम गुंतवून मोठा फंड उभारायचा असेल तर नक्कीच तुमच्यासाठी ही योजना कामाची ठरणार आहे.

कसे मिळणार 17 लाख रुपये

जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपयांचे म्हणजेच दररोज 333 रुपयांची गुंतवणूक केली तर 10 वर्षांनी सदर गुंतवणूकदार लखपती होतो.

10 वर्षात संबंधित गुंतवणूकदाराची गुंतवणूक बारा लाख रुपये होते आणि यावर गुंतवणूकदाराला 5.08 लाख रुपयांची व्याज मिळते. अर्थात दहा वर्षानंतर दरमहा दहा हजार रुपये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला 17.08 लाख रुपये मिळतात.

नक्कीच तुम्हाला पण तुमच्या पगाराचा एक हिस्सा सुरक्षित ठिकाणी गुंतवायचा असेल तर पोस्टाचा आरडी योजनेचा पर्याय तुमच्यासाठी एक उत्कृष्ट ऑप्शन राहणार आहे.