Ladaki Bahin Yojana : आजपासून नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. काल आपण सर्वांनी 31 डिसेंबर अर्थात मागील वर्षाचा शेवटचा दिवस आनंदात घालवला आणि नव्या वर्षाचे स्वागत केले.
आता या नव्या वर्षात अनेक गोष्टी आणि नियम बदलले आहेत. दरम्यान नव्या वर्षाच्या सुरुवातीला राज्यातील लाडक्या बहिणींसाठी देखील एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे.

खरंतर आज लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आज पासून राज्यातील लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये वितरित केले जाणार आहेत.
पण हे पैसे फक्त ज्या लाभार्थ्यांनी केवायसी केलेली आहे त्यांच्याच खात्यात जमा होतील अशी पण माहिती समोर आली आहे. खरंतर केवायसी प्रक्रियेसाठी शासनाने 31 डिसेंबर पर्यंत मुदत दिलेली होती.
आता 31 डिसेंबरचा काळ उलटला आहे आणि केवायसीची मुदत सुद्धा संपली आहे. खरे तर 31 डिसेंबर नंतर पण केवायसी करता येणार अशी आशा महिलांना होती.
मात्र शासनाने केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याबाबत अद्याप कोणतेच परिपत्रक जाहीर केलेले नाही. म्हणजेच आता केवायसी प्रक्रिया बंद होणार आहे. वास्तविक शासनाने केवायसीसाठी फक्त 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत दिलेली होती.
मात्र सुरुवातीच्या टप्प्यात महिलांना केवायसी साठी वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागला आणि म्हणूनच राज्य शासनाने केवायसी प्रक्रियेला 31 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला.
पण या मुदत वाढीनंतरही जवळपास 45 लाख महिलांनी केवायसी केलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. हेच कारण आहे की केवायसीला मुदतवाढ मिळायला हवी अशी मागणी संबंधित लाभार्थ्यांच्या माध्यमातून उपस्थित केली जात होती.
यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा देखील सुरू होता. मात्र शासनाने यावेळी केवायसी साठी कोणतीच मुदतवाढ दिलेली नाही. अद्याप तरी केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याबाबत कोणताच ठोस निर्णय शासन दरबारी घेण्यात आला नसल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे आता ज्या महिलांनी केवायसी केलेली नाही त्यांना यापुढील हप्ते मिळणार नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, जर शासनाने केवायसी प्रक्रियेला मुदत वाढ दिली नाही तर जवळपास राज्यातील 45 लाख लाडक्या बहिणींना आता यापुढील हप्त्यांचा लाभ मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.
अर्थातच या योजनेतून राज्यातील तब्बल 45 लाख महिला एकाच वेळी काढल्या जाणार आहेत. नक्कीच हा लाखो महिलांसाठी एक धक्कादायक निर्णय ठरणार आहे.