श्वास घेताना दम लागतोय; तर तुम्हाला हे करावेच लागेल.

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- चालताना दम लागण्याचा त्रास आपणा सर्वांना जाणवत असेलच.सध्याच्या काळात बळकट फुफ्फुसांसाठी आरोग्यवर्धक आहार घेणे महत्त्वाचे आहे. फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही उपाय करणे जास्त महत्त्वाचे आहे.

चालणे,पळणे, दोरीवरच्या उड्या आणि पोहने हा त्यावर सर्वोत्तम उपाय ठरु शकतो. तरीपण आहारात आपण काही गोष्टी आहेत त्यांचा समावेश करायला हवा. आज आपण त्यावर एक नजर टाकुयात.

लिंबू, आलं आणि पिपरमिंट चहा : हे अँटी ऑक्सीडेन्ट सह शरीराला डिटॉक्स करण्यात मदत करतात. ज्यमुळे फुफ्फुस बळकट होतात.चहामध्ये लिंबू आणि आलं टाकून घेतलेलं शरीराला चांगले राहते.

मध आणि गरम पाणी : गरम पाण्यात मध टाकून घेतले जाते.फुफ्फुसांना प्रदूषकांपासून लढण्यात मदत करण्यात मध आणि गरम पाणी पिणं प्रभावी आहे. याचे कारण असे की मधात अँटी इंफ्लिमेंट्री गुणधर्म असतात.

ग्रीन टी :शरीराला रोज ग्रीन टी घेतलेल चांगले असते. दररोज आलं, लिंबू, मधासह एक कप ग्रीन टी प्यावी. हे फुफ्फुसांना स्वच्छ करण्यात मदत करते.

ज्येष्ठमधाचा चहा : जेष्ठमाधाचा चहा कोणाला माहित पण नसेल.हा चहा लोकप्रिय नसला तरी खोकला, शरीर आखडणे आणि तापाला कमी करण्यात प्रभावी मानले जाते. तसेच यामुळे हृदयरोगाचा धोका कमी करण्यात आणि फुफ्फुसे स्वच्छ करण्यात मदत मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News