टोकियो : शेकडो वर्षांची परंपरा असलेली अनेक हॉटेल जगामध्ये आहेत. अर्थात काळासोबत ती आपल्यामध्ये बदल करून घेत असतात. मात्र जपानमध्ये असे एक हॉटेल आह, ज्याने आजही आपला इतिहास कायम टिकवून ठेवला आहे. हे जगातील सर्वात प्राचीन हॉटेल असून त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्डमध्येही दाखल आहे.
‘निशियामा ओनसेन कियूनकन’ असे या हॉटेलचे नाव आहे. फुजिवारा महितो नावाच्या व्यक्तीने सन ७०५मध्ये हे हॉटेल सुरू केले होते. १३०० वर्षांपूर्वीचे हे हॉटेल आज त्याच कुटुंबाची ५२वी पिढी चालवत आहे. या हॉटेलमध्ये जगभरातून लोक येतात. त्यांच्यात काही मोठ्या हस्तींचाही समावेश आहे. हे हॉटेल आपल्या आलिशान गरम झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे झरे त्याला अन्य हॉटेलपेक्षा वेगळी ओळख मिळवून देतात.

या हॉटेलच्या एका बाजूस सुंदर नदी वाहते, तर दुसरीकडे घनदाट जंगल आहे. हॉटेलची खिडकी उघडल्यावर तुम्हाला तिथला शानदार नजारा दिसतो. तो पाहून तुम्हाला वारंवार तिथे जावेसे वाटेल. हॉटेलमध्ये एकून ३७ खोल्या असून त्यांचे एका रात्रीचे भाडे ३३ हजार रुपये आहे. या हॉटेलचे वेळोवेळी नुतनीकरण होत असते.
- प्रतीक्षा संपली ! मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मुहूर्त ठरला, ‘या’ तारखेला धावणार Bullet Train
- ब्रेकिंग ! केंद्र पाठोपाठ ‘या’ राज्यात स्थापित झाला आठवा वेतन आयोग, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
- मुंबई ते नाशिक प्रवास होणार वेगवान ! तयार होणार १३१ Km लांबीचा नवा रेल्वेमार्ग, या गावांमधून जाणार नवा मार्ग
- ……तर राज्यातील 45 लाख लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा लाभ मिळणार नाही ! नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच फडणवीस सरकारचा दणका
- ब्रेकिंग ! नव्या वर्षात मुंबईसह महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी, महाराष्ट्रात किती दिवस राहणार पावसाचे सावट?