Ahilyanagar News : दुष्काळी भागातील गावांना पाणी मिळावे याकरता स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी निळवंडे धरणाचा आग्रह धरला आणि हे धरण व कालवे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केले. उर्वरित वरच्या गावांसाठी थोरात कारखान्याच्या माध्यमातून 1994- 95 मध्ये भोजापुर चारी तयार करण्यात आली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात वेळोवेळी निधी मिळून ही पुरचारी पूर्ण असल्याने व यावर्षी पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने ओहरफ्लो चे पाणी आले असून यामुळे शेतकरी आनंदी झाला आहे.
वटमाई डोंगराजवळ थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने तयार झालेल्या चारीतून पाणी आल्याने हे पाणी नान्नज दुमाला बांधाऱ्यांमध्ये सोडण्यात आले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला याप्रसंगी बाबासाहेब कडनर, कचरू फड, सौ केशरबाई सानप, दिनकर चत्तर, किरण कडनर, सुरेश सानप, भारत सानप, बाळासाहेब फड, सुनील कासार, राजेंद्र , मोकळ आदींसह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

नान्नज दुमाला ,सोनोशी, पिंपळे, बिरेवाडी यांसह पश्चिम भागातील गावांना पाणी मिळावे याकरता स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने स्वखर्चाने 1994- 95 मध्ये ही पुरचारी निर्माण केली. त्यावेळेस डोंगरापर्यंत पाणी आले .2006 मध्ये तत्कालीन कृषी व जलसंधारण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची सर्व कर्मचारी यांनी श्रमदान केले. याचबरोबर कारखान्याची जेसीपी सह सर्व यंत्रणेने काम करून तीगावमाथापर्यंत चारी पुढे नेली. 2008 मध्ये या चारी साठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी 5 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर करून एक्वाडक्ट, स्ट्रक्चरल ची कामे, भूसंपादन यांसह विविध कामे मार्गी लावली.
2021 मध्ये या चारीच्या दुरुस्तीकरता पुन्हा 2 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. थोरात कारखान्याने दरवर्षी या चारीची देखभाल दुरुस्ती केली. या चारीच्या माध्यमातून पिंपळेसह पारेगाव बुद्रुक चिंचोली गुरव देवकवठेपर्यंत पाणी पोहोचले. नानज दुमाला सोनूशी क्षेत्रातही पाणी आले.
यावर्षी मे मध्येच चांगला पाऊस झाल्याने जून जुलै अखेर भोजापुर धरण ओहर फ्लो झाले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंजूर करून ठेवलेल्या दोन कोटी 12 लाख रुपयांच्या निधीमधून उर्वरित कामे तातडीने झाल्याने हे पाणी सहज डोंगरापर्यंत आले. माजी मंत्री थोरात यांचा सततचा पाठपुरावा, कारखान्याचे सहकार्य आणि निसर्गाची साथ या सहकार्यातून भोजापुर चारीतून आलेल्या पाण्याने शेतकरी वर्ग आनंदी झाला असून या माध्यमातून विविध बांधारे भरून घेण्यात येत आहेत.
थोरात कारखान्याच्या मदतीने भोजापुर चारी ! पाण्याचे राजकारण करू नये
नान्नज दुमाला सह उर्वरित गावांकरता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या मदतीने भोजापुर चारी करण्यात आली आहे. माजी मंत्री थोरात यांनी 2 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आणि त्यातून दुरुस्ती व रुंदीकरणाची कामे झाली. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने लवकर पाणी आले. याचा सर्वांना आनंद आहे. पाणी देण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांचे योगदान तालुक्यात कोणीही नाकारू शकणार नाही किंबहुना राज्यात तालुक्याची ओळख माजी मंत्री थोरात यांच्यामुळे आहे. आतापर्यंत त्यांनीच काम केले आहे. हे काम मागच्या 8 महिन्यात झालेले नाही. त्यामुळे पाण्याचे कोणीही राजकारण करू नये असे आवाहन बाजार समितीचे माजी संचालक दिनकर चत्तर यांनी केले आहे तर शेतकऱ्यांसाठी हा आनंदाचा क्षण असल्याचे बाबासाहेब करणार सौ केशरबाई सानप, कचरू फड यांनी म्हटले आहे.