पोट भरण्यासाठी कर्जावर जुनी चारचाकी घेतली, ‘लाडकी बहीण’ला अपात्र झाली ! अनेकांच्या व्यथा

यातील काही अटी जाचक असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर शासनाने त्या अटी देखील शिथिल केल्या. दरम्यान सध्या त्यात एक अट अशी आहे की, चारचाकी गाडी नसावी. (ट्रॅक्टर सोडून) त्यामुळे सध्या अनेक गोरगरीब बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याची व्यथा अनेकांनी मांडली आहे.

cm

Ahmednagar News : सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. मतदारसंघातील लाभार्थी महिला या योजनेपासून वंचित राहू नये तसेच त्यांना प्रकरणे सादर करण्यासाठी कागदपत्रे मिळण्यास अडचण येऊ नये म्हणून तातडीने अनेक लोकप्रतिनिधींनी मार्गदर्शन व मतदान केंद्र सुरू केले.

दरम्यान यातील काही अटी जाचक असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर शासनाने त्या अटी देखील शिथिल केल्या. दरम्यान सध्या त्यात एक अट अशी आहे की, चारचाकी गाडी नसावी. (ट्रॅक्टर सोडून) त्यामुळे सध्या अनेक गोरगरीब बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याची व्यथा अनेकांनी मांडली आहे.

लाडकी बहीण योजनात चारचाकी वाहनाची अट घातली. केवळ ऐशो आराम, चैनीचे अथवा आर्थिक सक्षमतेचे प्रतीक मानली जाणारी चारचाकीचे ग्रामीण आणि गोरगरिबांसाठी पोट भरण्याचे साधन आहे.

ट्रॅक्टरच्या फक्त दहा वीस टक्के किमतीत अनेक भूमिहीन आणि घर नसलेल्या लोकांकडे या गाड्या तर काही गावात वाडी वस्तीवर एसटी बस किंवा अन्य साधने नसल्याने घरातील वृद्ध व्यक्तींना किंवा संकटकाळी वापरण्यासाठी या चारचाकी घेतल्या.

विशेष म्हणजे यातील बहुतेक चारचाकी जुन्या वापरलेल्या विकत घेतल्या. यांची किंमत पंचवीस हजार ते एक लाखापर्यंत आहे. अशा गाड्या असणाऱ्या बेरोजगारांनी कर्जाऊ गाड्या घेतल्या. या चारचाकी मालकांच्या घरातील कुटुंब मोलमजुरी करते.

आता या कुटुंबातील लाडक्या बहिणी योजनेपासून वंचित राहणार आहेत. माझी दहा बाय बाराची एक खोली आहे. शेती नोकरी नाही शेतमजूर वाहतूक करण्यासाठी जुनी एक लाख रुपयांची गाडी कर्जावर घेतली आहे अशी एक प्रतिक्रिया एका गाडी मालकने दिली आहे.

मला स्वतःचे घर नाही. कोरोनात मुंबईत रोजगार गेला. गावी आलो दोन वर्षे आम्ही पती-पत्नीने मजुरी केली. कर्जावर जुनी गाडी घेतली पण आता या योजनेला मी लाभार्थी नाही अशी व्यथाही एकाने मांडली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe