सूरत-चेन्नई ग्रीन फील्ड ! स्वप्न मोठी पण नियत खोटी? शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदलाच मिळेना, विखेंसह गडकरींनाही निवेदन तरीही..

सूरत-चेन्नई ग्रीन फील्ड हा महामार्ग विकासाचा एक मोठा टप्पा पार करण्यास सहाय्यक ठरणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातून अनेक गावांतून हा महामार्ग जाणार आहे. त्या अनुशंघाने युद्धपातळीवर काम सुरु आहे. परंतु एकीकडे भविष्याची स्वप्न जरी मोठी असली तरी सध्या शेतकऱ्यांची सध्याची स्वप्ने धुळीस मिळताना दिसत आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
greenfiald

Ahmednagar News : सूरत-चेन्नई ग्रीन फील्ड हा महामार्ग विकासाचा एक मोठा टप्पा पार करण्यास सहाय्यक ठरणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातून अनेक गावांतून हा महामार्ग जाणार आहे. त्या अनुशंघाने युद्धपातळीवर काम सुरु आहे.

परंतु एकीकडे भविष्याची स्वप्न जरी मोठी असली तरी सध्या शेतकऱ्यांची सध्याची स्वप्ने धुळीस मिळताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहणाचा मोबदलाच मिळालेला नाही. नगर तालुक्यातील मांजरसुंबा, पिंपळगाव माळवी, धनगरवाडी, शेंडी, पोखडी, पिंपळगाव उज्जैनी,

कापूरवाडी, भिंगार, शहापूर व सारोळाबद्दी या गावातील शेतामधून प्रस्तावित सूरत-चेन्नई राष्ट्रीय ग्रीन फीड महामार्गाचे संपादन झाले आहे. मात्र, शेतकऱ्यांना याचा मोबदला मिळेना. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.

विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी याबाबत न्याय मिळावा, यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदने दिली आहेत. भू-संपादनाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

सर्व गावे नगर शहराच्या जवळची व बागायत क्षेत्र असणारी व जमिनीचे बाजारभाव खूप जास्त असणारी आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जमीन भू-संपादनासाठी शेतकऱ्यांनी विरोध केला होता.

परंतु लोकप्रतिनिधींनी सदरची जमीन राष्ट्रीय कामासाठी आवश्यक असल्याचे व जमिनीचा योग्य मोबदला मिळेल, असे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यानी भू-संपादन कामी विरोध केला नाही. भू-संपादन प्रक्रिया शांततेत पार पडली.

भू-संपादनाचा अंतिम निवाडा होत आता दीड वर्षांचा कालावधी होत आला आहे. भू-संपादन निवाड्यानुसार झालेली रक्कम मिळावी म्हणून शेतकरी भू-संपादन अधिकारी व प्रकल्प अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करीत आहेत. परंतु, अद्याप ही शेतकऱ्यांना भू-संपादन झालेल्या जमिनीचा मोबदला दिलेला नाही हे वास्तव आहे.

भू-संपादन निवाडा मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या विरोधात निवाडा लवादात टाकण्याची कृती शेतकऱ्यावर अन्याय करणारी आहे. शेतकऱ्यांची कोणतीही चूक नसताना पिळवणूक होत असल्याची भावना आता नागरिकांत निर्माण होऊ लागली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe