Ahmednagar News : पावसाळ्यात ‘अशी’ घ्या जनावरांची काळजी; गोठ्याचे कसे कराल योग्य व्यवस्थापन?

Published on -

Ahmednagar News : सध्या पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात जनावरांची खूप गैरसोय होत असते. अशा स्थितीत पशूपालकांनी जनावरांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे, जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. तुम्ही जर पावसाळ्यात जनावरे चरायला शेतात नेत असाल, तर विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पावसामुळे एका जागेवर थांबण्याची वेळ आली, तर पावसाखाली जनावरे घेऊन थांबू नका. जवळपास निवारा असेल, तर तिथे घेऊन जा. जेणेकरून वीज पडून जनावरे दगावणार नाहीत.

शेतकऱ्यांसाठी जनावरांचे मोठे महत्व असते. जवळपास प्रत्येक शेतकऱ्याकडे गायी किंवा म्हशी तसेच शेळ्या असतातच. हा व्यवसाय शेतकऱ्याच्या उत्पन्नात भर घालीत असतो. पावसाळ्यात हवेतील आर्दतेचे प्रमाण वाढते, तसेच उनही कमी असते. त्यामुळे जनावरांच्या गोठ्यात ओल राहाते. परिणामी जंतुंच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होते. परिणामी जनावरे अनेक प्रकारच्या आजारांना बळी पडतात.

अशा परिस्थितीत जनावरांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. पावसाळ्यात जनावरांच्या गोठ्याचं योग्य व्यवस्थापन करणं खूप आवश्यक आहे. गोठ्यात ओल राहाणार नाही, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी गोठ्यात जास्तित जास्त सूर्यप्रकाश व हवा कशी येईल, याकडे लक्ष द्यावे. गोठा पोटॅशियम परमॅगनेटच्या द्रावणाने धुवून घ्यावा. गोठा कोरडा ठेवण्याचा प्रयत्न करा. गोठ्यातील जनावरे एकाच ठिकाणी जास्त वेळ बांधून ठेवू नका. गोठ्यातील शेण, मूत्र वारंवार बाजुला करा.

पाऊस पडत असताना गोठ्याच्या बाजुला ताडपत्री किंवा बारदाना लावावा. त्यामुळे पावसाचे पाणी गोठ्याच्या आत येणार नाही. गोठा आला होऊन गोठ्यात खड्डे पडतात, ते वेळीच मुरूम टाकून भरून काढावेत. जनावरांना शक्यतो भिजलेला चारा खाऊ घालू नका. ओले गवत जनावरे कमी वेळेत व अधिक खातात, त्यामुळे जनावरांच्या पोटाचे आरोग्य बिघडून प्रसंगी जनावराच्या जीवावरही बेतू शकते. त्यामुळे पशुखाद्य किंवा चारा कोरडा ठेवण्यासाठी दक्षता घ्या.

चारा टाकताना ओल्या जमिनीवर टाकू नका. यामुळे चाऱ्याबरोबर जंतुही पोटात जाण्याची शक्यता असते. यासाठी गव्हाण तयार करा व तीही कोरडी ठेवा. पावसाळ्यात बाजुला करा. पाऊस पडत असताना गोठ्याच्या बाजुला ताडपत्री किंवा बारदाना लावावा. त्यामुळे पावसाचे पाणी गोठ्याच्या आत येणार नाही. गोठा आला होऊन गोठ्यात खड्डे पडतात, ते वेळीच मुरूम टाकून भरून काढावेत. जनावरं चरायला शेतात नेत असाल, तर विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पावसामुळे एका जागेवर थांबण्याची वेळ आली, तर पावसाखाली जनावरे घेऊन थांबू नका. जवळपास निवारा असेल, तर तिथे घेऊन जा. जेणेकरून वीज पडून जनावरे दगावणार नाहीत.

पावसाळ्यात गवत मोठ्या प्रमाणावर उगते. जनावरांना टाकताना एकाच वेळी जास्त गवत टाकू नका. टप्प्या टप्प्याने ठराविक वेळेनंतर टाका. जेणेकरून एकाच वेळी सर्व गवत पोटात जाणार नाही व जनावरांना रवंथ करायला पुरेसा वेळ मिळेल. तसेच विषारी गवत खाऊन अनेक जनावरांचा मृत्यू होत असतो, त्यामुळे याचीही काळजी घ्या. पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा उन्हाळ्यात जनावरांना साथीच्या आजरांपासून दूर ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News