निवडणुकीसाठी प्रशासनाची होणार तारांबळ ! तब्बल इतक्या गावांमध्ये अजूनही दूरध्वनीची सुविधा नाही

Ahmednagarlive24 office
Published:

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर देशात सर्वत्र ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यात आला असतना अकोले तालुक्यातील तब्बल १९ गावांमध्ये अजूनही दूरध्वनीची सुविधा नाही. त्यामुळे मतदार केंद्रांवरील मतदानाच्या आकडेवारीसह हालचालींबाबत माहिती घेताना निवडणूक आयोगाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

देशामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. आदिवासी परिसराचा विकास व तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून आदिवासी बांधव मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; परंतु आदिवासी भागातील काही वाड्या वस्त्यांवर रस्ते, आरोग्य, वीज आणि विज्ञान युगात असलेल्या दूरध्वनी अथवा संपर्क यंत्रणा या मूलभूत सोयी-सुविधा फक्त कागदोपत्रीच दिसून येत आहेत.

दूरध्वनी संच, मोबाईल, संगणक प्रणाली विज्ञान युगात महत्त्वाची मानली जाते. नगर जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेला अकोले आदिवासी तालुका आहे. पूर्व-पश्चिम लांबी ६० कि.मी पेक्षा जास्त असणारा अकोले तालुका जिल्हातील सर्वात मोठा क्षेत्राफळ असणारा तालुका आहे. अकोले तालुक्यात अकोले, राजूर व कोतुळ अशी ३ महसुली मंडळ असुन १९१ गावे आहेत. २ लाख ६६ हजार ६३८ लोकसंख्या आहे. तर यापैकी १ लाख २१ हजार ५६६ लोकसंख्या अनुसूचित जमातीची आहे.

तालुक्याचा पश्चिम भाग मुख्यतः डोंगराळ व दुर्गम आहे. अकोले मतदारसंघात सागवी (दगडवाडी), देवगाव, लाडगाव, पांजरे, साम्रद, रतनवाडी, चिंणावणे, तेरुगण (सरोवरवाडी), कुमशेत, पेठेचीवाडी, पाचनई, अंबित, सिसवद, लव्हाळी ओतुर, फोंफसडी, खेतेवाडी खाडगेदरा, म्हसवंडी या गावामध्ये १२ हजार ८९२ मतदार वास्तव्यास आहेत; मात्र ही गावे अजूनही दूरध्वनी संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची नोंद शासन दरबारी झाली आहे.

रेशन घेण्यासाठी पॉस मशीनवर लाभधारकाचा अंगठा घेणे बंधनकारक झाले आहे, तसेच आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी, शाळेतील मुलांसाठी ऑनलाईन अभ्यासक्रम तसेच दळणवळण बरोबर एकमेकांच्या संपर्क करण्यासाठी नेटवर्क अथवा दूरसंचार यंत्रणेची आवश्यकता लागत असते; पण मात्र या १९ गावांमध्ये केंद्र व महाराष्ट्र शासन दूरसंचार संपर्क यंत्रणा उपलब्ध करून देण्यास असमर्थ ठरले आहेत.

परिणामी रेशन रेशन कार्ड वरील अन्नधान्य, संगणक युगातील अभ्यासक्रम, जनतेतील सुसंवाद साधनाऱ्या यंत्रेना अभावी आदिवासी भागातील जनता कोसोमैल दूर आहे.

अकोले तालुक्याच्या आदिवासी भागातील १९ मतदान केंद्र परिसरात मोबाईलचे टॉवर नाहीत. त्यामुळे या भागांत नेटवक नाही. परिणामी १९ गावे संपर्क क्षेत्राबाहेरच असल्याने या भागातील १९ मतदान केंद्रांवरील मतदानाची आकडेवारी घेण्यासाठी ‘रनर’ नेमण्यात आले आहेत. ते मतदान केंद्रावरील मतदानाची आकडेवारी दर दोन तासांनी घेणार आहेत. -डी. बी. वाघ, सहाय्यक निवडणूक अधिकारी, अकोले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe