नगर जिल्ह्यातून तब्बल ‘इतक्या’ लाख ‘लाडक्या बहिणींचे’ अर्ज दाखल दाखल ..!

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी, तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेची नुकतीच घोषणा केली आहे.

त्यानुसार नगर जिल्ह्यात महिला बालकल्याण विभाग, महसूल, ग्रामविकास विभागासह अन्य यंत्रणा या योजनेचे फॉर्म भरून घेण्यासाठी राबत आहेत. या यंत्रणेतील गाव पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे फलित म्हणून सरकारच्यावतीने माझी बहिण लाडकी योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या अँपवर आतापर्यंत ६ लाख ५० हजार अर्ज अपलोड करण्यात आले आहेत.

दरम्यान, अपलोड करण्यात आलेल्या अर्जाची तालुका पातळीवर पडताळणी सुरू करण्यात आली असल्याची माहिती महिला बालकल्याण विभागाच्यावतीने देण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेतील पात्र महिलांचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वीकारण्यात येत असून येणारे अर्ज नारी शक्तीदूत अँपवर अपलोड करण्याच्या कामात अंगणवाडी सेविका व्यस्त आहेत.

यामुळे एकटचा नगर जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ५० हजार महिलांचे माझी बहिण लाडकी योजनेचे अर्ज नाही शक्तीदूत अपलोड झालेले आहेत. आता अँपवर राखल झालेल्या अर्जाची पडताळणी सुरू करण्यात आली आहे.

या पडताळणीत संबंधीत महिलेच्या अर्जानुसार तिच्या रहिवासी दाखला, उत्पत्राचा दाखला जोडलेला आहे का? संबंधीव अर्ज योजनेच्या अटीशर्तीत बसणारा आहे? यासह अन्य माहितीची पडताळणी तालुका पातळीवर तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि महिला बालकल्याण अधिकारी यांची समिती करणार आहेत.

जिल्ह्यात ६ लाख ५० हजार अर्ज अँपवर अपलोड झालेले असून या सर्व अर्जाची पडताळणी करण्यासाठी तालुका समितीला मोठा कालावधी लागणार असल्याचा अंदाज महिला बालकल्याण विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्हास्तरावर होणार पुन्हा पडताळणी तालुकास्तरावर अँपमध्ये अपलोड झालेल्या अर्जाची पडताळणी झाल्यावर संबंधीत सर्व तालुकानिहाय अर्ज पातळीवर पोहचणार आहेत. त्याठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या पातळीवर असणाऱ्या समितीची टीम अर्जाची खातरजमा करून ते मंजूरीसाठी राज्याला पाठवणार आहेत. त्यानुसार राज्य पातळीवरून संबंधीत महिलेचे अनुदान मंजूर होवून त्याचा लाभ मिळणार आहेत.

नगर जिल्ह्यात या योजनेत महिला बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविका, तालुका आणि जिल्हा पातळीवरील महिला बालकल्याण विभागातील अधिकारी कर्मचारी, प्रामपंचायत विभागाचे ग्रामसेवक, महिला बबट गटाच्या प्रतिनिधी, सेतू केंद्र चालक, आरोग्य विभागाच्या आशा सेविका, महापलिका आणि नगर पालिका नगर परिषद विभागाची मंत्रणा असे सुमारे १५ ते २० हजार कर्मचारी आणि स्वयंसेवक ही योजना यशस्वी करण्यासाठी काम करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe