Ahmednagar News : पिण्याच्या पाण्यापासून होणारे विविध आजार टाळण्यासाठी वॉटर फिल्टरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार चांगला असला, तरी घराघरात मातीच्या भांड्याची जागा अजूनही टिकून आहे. शहरासह ग्रामीण भागातही वॉटर प्युरिफायर घरोघरी पोहोचले आहेत.
अनेक ग्रामपंचायतींनी गावासाठी फिल्टर पाण्याची व्यवस्था केली आहे; मात्र माठातील पाणी चवदार असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

उन्हाच्या झळा वाढु लागल्याने माठ विक्रीची दुकानेही बाजारात व रस्त्या रस्त्यावर थाटली आहेत. आकारानुसार माठाच्या किमतीही आहेत. त्यामुळे खरेदीची धुम सुरुच आहे. गेल्या आठवड्यापासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून गेल्या दोन-तीन दिवसात पावसाचा अंदाज असल्याने पारा चढ उतार करत आहे.
त्यात उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाल्याने थंड पाण्याची गरज भासू लागली आहे. विशेषत दुपारी तीव्रता जाणवत आहे. परिणामी मातीच्या माठांनाही मागणी वाढल्याचे चित्र आहे. अनेक घरांमध्ये फ्रिज असले तरी माठांची जागा ही कायम आहे.
अनेक जणांनी फ्रिजचे पाणी आरोग्यासाठी त्रासदायक ठरते. त्यामुळे अशी मंडळी माठाच्या पाण्याला प्रधान्य देतात. गोरगरिबांच्या घरी माठाला अर्थात गरिबांच्या फ्रीजला वाढती मागणी असले तरीही काही ठिकाणी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत.
यंदा बाजारात माठाच्या आकारानुसार २०० ते २५० रूपये, तोटी रांजण माठ ५०० ते ६०० रूपये आहेत. साहित्याचे दर वाढल्याने माठाचे दर वाढत आहेत. महागाई प्रचंड वाढत आहे त्यामुळे काळ्या माठाचे भावही गगनाला पोहोचले आहेत.
कोळसा व मातीचे भाव वाढल्यानेच माठाचे भाव वाढले आहे. मागच्या वर्षापेक्षा यंदा माठाच्या किमतीत २० ते २५ टक्के दराने वाढ झाली आहे. मातीच्या माठाचे पाणी पिण्यास शरीरासाठी अधिक लाभदायक असल्याचे जाणकार सांगतात. यामुळे ग्रामीण भागासह आता पुन्हा एकदा माठ व रांजण खरेदीकडे कल वाढला आहे.