मतदारसंघातील गरजू रुग्णांसाठी ४० लाखांचा निधी प्राप्त : आ. मोनिका राजळे

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : शिंदे फडणवीस महायुती शासनाच्या कालावधीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून शिफारस केलेल्या मतदारसंघातील ५४ गरजू रुग्णांसाठी सुमारे ४० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती आ. मोनिका राजळे यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून, वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे आधुनिकीकरण करून, पारदर्शक व सुलभ सेवा देण्याबरोबरच,

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा, मानून, जास्तीत जास्त गरजू रुग्णांना वैद्यकीय सहाय्यता देण्यासाठी, प्रयत्न करीत असल्याची माहिती आ. राजळे यांनी दिली.

शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच चॅरिटी हॉस्पिटल व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपचार मिळू न शकलेल्या दुर्धर व गंभीर आजार असलेल्या रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत मदत करण्यात येते,

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीकरिता एकूण वीस गंभीर, आवश्यक आजारांसाठी मदत करण्यात येते. मतदारसंघातील हलाखीची आर्थिक परिस्थिती असणाऱ्या व इतर शासकीय योजना अंतर्गत लाभ न मिळू शकणाऱ्या रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आमदार जनसंपर्क कार्यालय,

पाथर्डी किंवा शेवगाव येथे संपर्क करण्याचे आवाहन राजळे यांनी केले. वैद्यकीय सहाय्यता उपलब्ध करून दिल्याबद्दल राजळे यांनी महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री, वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचे आभार व्यक्त केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe