Ahmednagar News : पावसाचा खरिपाच्या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. त्याबरोबर पावसाने भाज्यांची अवाक देखील कमी होत असल्याने भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढले आहेत. सध्या मेथी, कोथिंबीर यांचे भाव पाहून अनेकजण ती घेण्याचे टाळतात. त्याचसोबत इतर भाजीपाल्याचे दर देखील चांगलेच वाढले आहेत.
मागील गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून राज्यभर चालु असलेल्या रिमझिम व संततधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . त्यामुळे कापूस, मूग, उडीद, बाजरी यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. पावसाच्या या तडाख्यातून भाजीपाला देखील सुटला नाही पावसाने
हिरव्या भाजीपाल्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
बाजारपेठेत हिरव्या भाजीपाल्यांचे दर आधीच वाढलेले होते, त्यातच महालक्ष्मीचे आगमन, भोजन प्रसादाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा महागाई वाढली आहे. या प्रसादात सोळा भाज्यांचा नैवेद्य महालक्ष्मीला दिला जातो. त्यामुळे भाजीपाल्याला मागणी वाढली आहे. टोमॅटोचे भाव उतरले, असले तरी गवारीच्या शेंगांचे भाव प्रतिकिलो दीडशे रुपये झाले आहेत.
सध्या राज्यात अनेक भागात सततधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे अनेक भागातील शेती व पिके देखील पाण्यात गेली. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पावसामुळे शेतात पाणी साचून असल्याने तसेच अनेक नद्यांना पूर आल्याने ग्रामीण भागातील अनेक रस्ते बंद झाले होते. त्यामुळे या गावांचा शहराशी संपर्क तुटला होता. परिणामी शेतातून शेतमाल बाहेर काढणे शक्य झाले नाही, मात्र इकडे आवक मंदावल्यामुळे बाजारात मेथी, कारले, गवार, भेंडी, दोडके, गिलके आदींच्या भावात वाढ झाल्याचे दिसून आले.
नगर कृषी उत्नन बाजार समितीत कमी प्रमाणात भाजीपाला येत असल्याने भाज्यांचे दर चांगलेच वाढले आहेत. त्यात गणेशोत्सव व महालक्ष्मीचे आगमन, भोजन यासाठी सोळा प्रकारच्या भाज्या कराव्या लागतात.
त्यामुळे या १६ भाज्या जमा करताना सामान्य महिलावर्गाची चांगलीच दमछाक झाली. यातील अनेक भाज्या काही प्रमाणात महागही झाल्या होत्या. सध्या एकीकडे गणेशोत्सवामुळे फुले, विड्याची पाने, केळीची भाजी पाने, दूर्वा यांचीही मागणी वाढली आहे. तर दुसरीकडे भाज्यांचे दार देखील मोठ्याब प्रमाणात वाढले आहेत. सध्या कोठींबेरीच्या एका जुडीसाठी तब्बल ५० ते ६० रुपये मोजावे लागत आहेत. तर मेथीसाठी ३० ते ४० रुपये दयावे लागतात.
यात गवार १३० ते १५० रुपये, घोसाळे५० – ६०, कारले ५० – ६० , दोडका ५० – ६० , भेंडी ५० – ६०, हिरवी मिरची ५० – ६० , शेवगा ४० – ५०, ९० – १००, मेथी ३० – ४०, कोथांबीर ५० – ६० असे दार मिळत आहेत.