१३ जानेवारी २०२५ भेंडा : नेवासे तालुक्यातील सौंदाळा आणि परिसरात आजपर्यंत विविध ठिकाणी अनेक चोऱ्या झाल्या आहेत.त्यात घरफोड्या, मोबाईल चोऱ्या, दुचाकी चोऱ्यांचा समावेश असून,अशा अनेक घटना घडत असतानाच चोरांनी महादेव मंदिरात गणपतीची मूर्ती आणि शिव लिंगावरील पार्वती माता या दोन मूर्तीची मंदिरातून चोरी झाली.
या मूर्तीची चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला आहे व त्या घटनेची रितसर पोलिसांमध्ये तक्रार केलेली आहे, तरीही त्याचा कुठलाही तपास लागलेला नाही.तसेच, सय्यद वस्तीवरील दोन दुचाकी चोरण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो अनर्थ टळला. तसेच, भेंडा बुद्रक येथील चांगुणामाता व्यापारी संकुलाशेजारी उभी केलेली संतोष कहाते यांची दुचाकी (एमएच १७ ९४६६) चोरीला गेली आहे.

अशा घटना एका पाठोपाठ एक घडतच आहेत, परंतु अद्याप कुठलाही तपास लागलेला नाही.सौंदाळा आणि परिसरात ज्या चोरीच्या घटना घडल्या आहेत त्याचा पोलिसांनी लवकरात लवकर तपास लावावा,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.