ठरले मग ; अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीकडून ‘हेच’ असतील आगामी उमेदवार ; दादांनी दिले ‘ते’ आदेश

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील काँग्रेसचे जिल्ह्यातील जेष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आमचे उमेदवार ठरले आहेत असे वक्तव्ये केले होते.

त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बैठकीतून मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे २५ उमेदवार ठरले आहेत.

विशेष म्हणजे अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातूनच लढणार आहेत. तर अहमदनगरमधून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

२५ उमेदवारांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत विधानसभा निवडणुकांसाठी २५ उमेदवार ठरले आहेत. लवकरच जागावाटप पूर्ण होणार आहे. महायुतीची चर्चा सुरु आहे मात्र तयारी असावी या दृष्टीने आतापासून कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यामध्ये बहतांश विद्यमान आमदारांचा समावेश आहे. अजित पवार बारामतीमधूनच लढणार हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. अजित पवारांव्यतिरिक्त उमेदवार बारामतीत नसणार. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तर वडगाव शेरीतून सुनील टिंगरेच पुन्हा रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत.

हे असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य २५ उमेदवार ? बारामती : अजित पवार, उदगीर : संजय बनसोडे, आंबेगाव : दिलीप वळसे-पाटील, दिंडोरी : नरहरा झिरवळ, येवला : छगन भुजबळ, पुसद : इंद्रनील नाईक, वाई खंडाळा महाबळेश्वर : मकरंद आबा पाटील, पिंपरी : अण्णा बनसोडे, परळी : धनंजय मुंडे, इंदापूर : दत्ता भरणे, रायगड : अदिती तटकरे, कळवण : नितिन पवार, मावळ : सुनील शेळके, अमळनेर : अनिल पाटील, अहेरी : धर्मराव बाबा अत्राम, कागल : हसन मुश्रीफ, खेड : दिलीप मोहिते-पाटील, अहमदनगर : संग्राम जगताप, जुन्नर : अतुल बेनके, वडगाव शेरी : सुनील टिंगरे अशी यादी समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe