उन्हाळ्यात पशूधनाची काळजी घेण्याची गरज

Published on -

Ahmednagar News : आजच्या काळातील सर्वात चिंतेचा विषय म्हणजे जागतिक तापमान वाढ. या तापमान वाढीमुळे मानवी जीवनावरच नाही तर पशू- पक्षी यांच्या जीवनमानावरही खूप वाईट परिणाम होत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात आपल्या पशुधनाची काळाजी घेणे गरजेचे असल्याचे डॉ. माणिक गोसावी यांनी सांगितले.

भारताचा दूध उत्पादनात जगात पहिला क्रमांक आहे. या तापमान वाढीमुळे फार मोठ्या प्रमाणात दूध उत्पादनामध्ये घट होते. जास्त तापमान वाढीमुळे जनावरांच्या शरीरातील तापमान वाढते व जनावरांवर अतिरिक्त ताण यायला लागतो. म्हशीचा रंग काळा आणि घामग्रंथी कमी असल्यामुळे शरीरातील उष्णता उत्सर्जित करताना अडचणी येतात.

म्हैस शरीरातील तापमान स्वानियांत्रित करू शकत नाहीत आणि त्यामुळेच, म्हशींना उष्णतेचा ताण किंवा त्रास होत असतो. जास्त तापमान वाढीमुळे जनावरांना उष्माघाताचा त्रास व्हायला लागतो व वेळीच इलाज न केल्यास जनावर दगावण्याची सुद्धा शक्यता असते.

तापमान वाढल्यानंतर जनावरे शरीराचे तापमान घामग्रंथी किंवा धापनेच्या प्रक्रियेमार्फत नियंत्रित करत असतात. उष्माघातामुळे जनावर विविध प्रकारची लक्षने दिसायला लागतात जसे की जोराने श्वास घ्यायला लागते, धापा टाकते, भूक मंदावते, शरीरातील उर्जा कमी होते,

नाडीचा वेग वाढतो, कातडी, कोरडी पडते, जनावराला पित्ताचा त्रास होऊन आतीसर होण्याची शक्यता असते, लघवीचे प्रमाण कमी होते, अकाली गर्भपात किंवा प्रसूती होण्याची शक्यता असते, माजाचे चक्र बिघडते.

असे काही झाल्यास नजीकच्या पशुवैदयकीय दवाखान्यात संपर्क करून लवकरात लवकर नोंदणीकृत पशुवैद्यकामार्फत उपचार करून घ्यावेत. खनिज मिश्रणाचा आहारात समावेश करावा, डोक्यावर थंड कपडा ठेवावा, मुबलक प्रमाणात थंड पाणी द्यावे, शरीरावर थंड पाणी शिंपडावे.

पशुवैद्यकाने उपचारात आयोडीनचा वापर करावा जेणेकरून लवकर शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होईल. आहारात प्रथिनाचा वापर करावा, ५० ग्राम खडे मीठ पाण्यात द्यावे, जेणेकरून शरीरात क्षाराची कमतरता भासणार नाही तसेच सोबत ५० १०० ग्राम खायचा सोडा द्यावा, पचन क्रिया व्यवस्थित होण्यास मदत होईल.

जनावरांना चरायला सोडावे किंवा दुपारी ४ नंतर पुन्हा चरायला सोडावे, दुपारी ३ ते ४ वेळेस थंड पाण्याचे तुषार पडतील, अशी व्यवस्था करावी, गाभण जनावरांना आतिरीक्त मात्रेत खनिज मिश्रणे आणि जीवनसत्वे नियमित खाद्यात पुरवावीत. दुपारच्या वेळेस शक्यतो चारा देऊ नये, जनावरांच्या निवाऱ्यासाठी गोठा हवेशीर असावा, गोठ्याच्या छतावर पाचट / कडबा टाकावा म्हणजे गोठा थंड राहील. गोठ्यात फॅन / कूलर आणि फॉगर्सचा वापर करावा, गोठ्याची उंची १६-२० फीटपर्यंत ठेवावी. उन्हाळ्यात जनावरांना योग्य मात्रेत जंतनाशक द्यावेत, शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मान्सून पूर्व लसीकरण न चुकता करून घ्यावेत, त्यात गाई व म्हशी साठी लाळ जनावरांना सकाळी लवकर बाहेर खुरकूत, घटसर्प, फऱ्या व सर्वात महत्त्वाचे.

जनावरांसाठी पुरेसे विहिरीचे / बोअरवेलचे थंड पाणी पाजावे, लोखंडाच्या होदातील पाण्याचे तापमान जास्त असते त्यामुळे गोठ्यात नेहमी सिमेंटचे टैंक वापरावीत व त्यास पांढरा रंग चुना वापरावा, पांढरा रंग हा सूर्यकिरणे परावर्तित करतो त्यामुळे पाणी थंड राहण्यास मदत होते. मुबलक प्रमाणात हिरवा चारा द्यावा, पूर्ण उन्हाळ्यात पुरेल असा मुरघास बनवून ठेवावा, अझोला कल्चरचा वापर करावा.

लम्पी चर्मरोगाच लसीकरण न चुकत करून घ्यावेत. शेळी व मेंढीसाठी अंत्राविषार, लाळ्या खुरकूत, पिपीआर, घटसर्प लसीकरण करून घ्यावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!